नवदुर्गांचा जागर सुरु झाला आहे. नऊ दिवस सुरु रहाणारा हा जागर आहे आत्मसन्मानाचा, आत्मनिर्भरतेचा, स्वत:मधील दुर्बलेतेच्या दैत्याचा वध करून स्वयंप्रेरणेने नवं जीवन घडवण्याचा...आजपासून ‘ती एक आदीशक्ती’ मध्ये आपण भेटणार आहोत अशाच अनेक नऊ नवदुर्गाना, ज्यांनी स्वत्वाचा शोध घेत सुरु केला एक नवा प्रेरणादायी अध्याय... आजच्या नवदुर्गा आहेत भिवंडी येथील कानाई बचत गटातील दुर्गमेश्वरी...ज्याप्रमाणे आदीशक्ती देवीचे अनेक रूप आहेत. त्याचप्रमाणे या कानाई बचत गटातील अनेक महिलांनी वेगवेगळी रूप धारण केली आहेत. विशेष म्हणजे पुरूषवर्ग जी जी कामे करू शकतात ती ती सर्व कामे या नवदुर्गांनी करून दाखविले आहे. अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा… http://navnagar.com/home.php?page=12&DATE=27-09-2014
जरी मी पत्रकार असली तरी आहे तर सामान्य नागरिकच ना...आता पत्रकार आहे म्हटल्यावर प्रश्न पडणं हे सहाजिकच आहे. दररोजचं जीवन जगताना आजुबाजूला काही ना काही घडतचं असतं. काही घटना मनाला पटण्याजोग्या असतात..तर काही मनात विचारांचे काहूर माजवतात...हे विचारांचे काहूर वाचनीय असतीलच असे नाही....पण ते व्यक्त होणे गरजेचे...नाही का? म्हणूनच म्हणतेय...प्रमिला म्हणे...
My Blog List
Thursday, 16 October 2014
Sunday, 12 October 2014
यशाचा झणझणीत स्वाद....
‘शंभर पुरुष एकत्र राहू शकतात, पण दोन स्त्रिया एकत्र आल्या की वादाला सुरुवात झालीच म्हणून समजा’ हा अगदी पूर्वापार समज आहे. (किंबहुना पुरुषांनीच तो निर्माण करून दिला असावा) तथापि स्त्रीशक्ती एकवटली की किती मोठी ताकद उभी राहू शकते याचेच उदाहरण ‘जागृती महिला बचत गटा’च्या महिलांनी दाखवून दिलेे. अनेक वर्षे उराशी बाळगलेलं स्वप्न बचत गटाच्या माध्यमातून पूर्ण होण्याचा आनंद कल्याणच्या मोहने येथील जागृती महिला बचत गटातील महिलांनी अनुभवला. या बचत गटाच्या महिलांच्या यशाचा झणझणीत स्वाद तुमच्यापर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही घेऊन आलोय खास तुमच्यासाठी....अधिक वाचा या लिंक वर http://navnagar.com/home.php?page=12&DATE=25-09-2014
Subscribe to:
Posts (Atom)