My Blog List

Sunday, 8 January 2017

व्यक्त

ती सध्या काय करते ??? ही फिल्म पाहीली.....फिल्म पाहुन कितीतरी का? आपल्यासमोर उभे राहतात.....खरं तर 'व्यक्त' हा शब्द किती लहान वाटतो ना....पण हेच व्यक्त झालेल्याला समजुन घेणं किती किचकट आहे राव!! समोरच्याला घेउन आपल्या मनात सुरु असलेली उलथापालथ त्याच्यासमोर उघड करणं म्हणजे व्यक्त होणं नाही का? अगदी साध्या, सोप्या भाषेत, सहजपणे आणि कसलाही जास्त विचार न करता जे मनात आणि डोक्यात सुरु आहे ते सांगुन मोकळं व्हावं.....पण हल्ली सोशल मिडीयावर अगदी छोट्या छोट्या गोष्टी अपडेट करुन खुलेपणाने व्यक्त होणारे आपण करतो का असं? बोलतो का आपण सगळं मनातलं? की स्वत:च विचारांच्या चक्रामध्ये फसतो? का बरं असं होतं???

काय विचारात पडलात ना? आठवा.. शेवटचं तुम्ही कधी व्यक्त झाला होतात? सगळं कसं भडभडा बोलून गेला होतात? आठवतंय? असो. अशा बऱ्याच गोष्टी असतील ज्या तुम्हांला व्यक्त करायच्या होत्या. नेमकं फिल्म बघीतल्या नंतर " अर्रर्र.....आपण त्या गोष्टी तेव्हाच सांगुन मोकळं झालो असतो तर....." असं राहुन राहुन वाटतं..... पण राहून गेलेल्या त्या सगळ्या गोष्टींचं आता राहून राहून वाईट वाटतंय. “का नाही बोलले/लो मी तेव्हा? बोलायला हवं होतं” किंवा “माझी चूक होती, मी माफी मागायला हवी होती”, मी त्यावेळी थोडं त्याला समजुन घेउ शकले असते ......मग का नाही जमलं मला ते...? वगैरे वगैरे. मुळात मुद्दा काय की, व्यक्त नाही झालात!!! जर मी बोलले/लो तर वाईट काय होईल किंवा मी का बोलायचं? याचा विचार करत बसलात. व्यक्त झालात तर चांगलं काय होईल याचा विचार नाही केला.
हाच तर प्रोब्लेम आहे ना राव....आपण दुनियाभरातल्या नको नको त्या गोष्टींचा विचार करुन आपलं आयुष्य घालवतो....आणि नेमक्या ज्या गोष्टीचा विचार करायचा असतो त्याच गोष्टीकडे आपला कानाडोळा होतो....मग काय होतं माहिते का? फक्त एक 'सॉरी' किंवा 'इट्स ओके' इतक्या छोट्या छोट्या शब्दांनी सुटणारा गुंता इतका किचकट होतो की बास्स्स.....जीव अगदी नकोसा होतो राव!!!

आपलं विचारचक्र वेडवाकडं चालत आणि विचारक्षमतेचा बट्याबोळ होतो. काय करावं ते सुचतं नाही. अगदी गळ्याशी आलं की मग आपण आपल्या प्रियजनांना सांगतो. पण तोपर्यंत आपण आणि आपल्यासोबतचा व्यक्तीही त्याच्या त्याच्या आयुष्यात खुप पुढे निघुन जातात....आणि मागे राहतो तो फक्त "का?".
बरं यापुढेही आणखी एक मोठा टास्क उभा राहतो तो म्हणजे "आधी कोण?". मित्र-मैत्रिणींनो आपल्याला सगळं समजतं मग अशावेळी नेमका  आपल्यातला समजुतदारपण कुठे जातो कोण जाणे? दोघांमधला एकजण समोरच्याकडुन सुरवातीची वाट पाहत झुरत असतो....बरं यात त्यालाही सुरवात करुन पुर्वीचे होते  नव्हते भांडण संपवुन टाकावेसे वाटत असते....पण जर मी सॉरी बोललो तर तिला काय वाटेल? हो-नाही, हो-नाही मध्ये पुन्हा गुंता सुरु होतो आणि मग खऱ्या अर्थाने व्यक्त होतो....खूप बर वाटतं, हलकं वाटतं, मनावरचं ओझं उतरतं, stress कमी होतो. पण हे सगळं नंतर का? त्या क्षणाला का नाही बोलत आपण? अशाच आयुष्यातल्या मौल्यवान संधी व क्षण आपण आपल्या मनातल्या भीतीने आणि नको त्या विचारांनी गमावतो.
असं घडण्यापेक्षा ज्या क्षणी जे वाटतंय ते बोलुन टाकावं... थोडीशी positive बाजू बघा त्या कृतीची. या फिल्ममधले दोन डायलॉग खुप भावले....पहिला म्हणजे "एफबीवर तुझे फोटो लपुन पाहताना मागुन कोणीतरी बघेल म्हणुन मला विंडो लगेच क्लोज नाही करायची" दुसरा म्हणजे "माझ्या मनातल्या भावना सांगण्यासाठी तुला टाईप केलेला एसएमएस लगेच बॅकस्पेस देउन डिलीट नाही करायचा"
व्यक्त होणं ही खूप सुंदर भावना आहे. नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा आधीच थोडा विचार आणि थोडी हिम्मत केली ना तर खरंच आयुष्यातली खूप complications कमी होतील. ‘आपल्याला काय हवंय, का हवंय आणि खरंच हवंय का?’ याचा विचार करून बघा आणि व्यक्त व्हा. ती सध्या काय करते किंवा तो सध्या काय करतो? हे प्रश्न पडण्याची वेळंच येणार नाही.....Be +!!!