My Blog List

Friday, 10 February 2017

आज तु मला टेडी दिलास खरा....

आज तु मला टेडी दिलास खरा....
पण लोक टेडीसोबत जसं खेळतात
तसं तु माझ्यासोबत खेळु नकोस कधी,
किंवा त्या टेडीच्या मऊमऊ कापसासारख्या
आपल्या प्रेमाची ऊब कधी मुकी होऊ देऊ नकोस कधी...
कसंय ना... लोक त्यांच्या फक्त एकट्यापणातंच टेडीची आठवण काढतात....
पण मला तुझ्या सुखा-दुःखात.....आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात साथीला रहायचंय...
टेडी अस्वल दिनाच्या खूप खूप शुभेच्छा....
-प्रमिला पवार

Thursday, 9 February 2017

गुलाबी डब्ब्यातले वेगवेगळे रंग

बऱ्याच दिवसांपासुन फेसबुकवर पोस्ट टाकण्यासाठी वेळ मिळाला नव्हता....आज लोकलमधुन प्रवास करताना घडलेला एक किस्सा सांगण्यासाठी आज वेळ काढलाच....
(इथे कुणा अमुक एका गटाला दुखवायचा हेतू नाहीये, मुद्दा मुंबईच्या लोकल रेल्वेचा फक्त त्रयस्थपणे मांडण्याचा अट्टाहास.)
आज दादरवरुन येण्यासाठी लोकल पकडली. लोकल म्हटली की गट आले, वेगवेगळ्या धर्माची माणसं आलीच...त्यातही सर्व महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा म्हणुन लेडीज डब्बा....पण या गुलाबी डब्ब्यातही आपापल्या धर्मानुसार भेदभावाचे रंग पहायला मिळतात....(त्यातलाच एक रंग आज पाहिला)
सर्व नोकरदार महिलांची लोकलमध्ये झुंबड उडाली होती... टिपीकल पोरिझम म्हणून काही मुली स्कार्प बांधून उगाच कानातले, गळ्यातलं
बघत होत्या....सोबतीला वर माथ्यावर भिरभिरणाऱ्या पंख्याचे संगीत होतेच बॅकग्राऊंड म्यूजिक म्हणून....मस्त गात होता तो...आणि मग मलाही एक भन्नाट गाणं आठवलं....'बघ बघ सखे कसं डुगु डुगू वाजतंय.....' बरं पुढे बोलते....इकडे ना सीट बुकींगही होतं बरं का...मोठ मोठे चष्मे चढवलेल्या त्या शांत बसलेल्या बायकांच्या दिशेने एक हात पुढे करून त्यांना आपल्या भुवया उंचवत विचारायचं कुठे उतरणार म्हणून...आणि मग उरली सुरली फोर्थ सिटवर बसताना बाजुला असलेल्या बाईला ''थोडं अडजस्ट व्हा ना'' असं नम्र बोललात तर उतरेपर्यंत नीट बसता येतं बरं का....जर आवाज थोडा जरी चढला तर मग काही खरं नाही....पुढे काय होतं ते माहित असेलच....असं सारं काही चित्रं होतं...माझ्या मागुन चार मुलींचा एक ग्रुप चढला आणि जी-ती आपली ओढणी, केस, पर्स आणि कानातले हेडफोन सुद्धा सावरत कसे बसे आत शिरण्याचा प्रयत्न करीत होत्या....आणि त्यांच्यातीलच एकीने मागुन एक सुचना दिली...."आतमध्ये बुरखा घालणाऱ्या बायका दिसतील तिथेच थांब....त्या सगळ्या कुर्ला किंवा मुंब्र्यालाच उतरतील...!" बरं म्हणजे सीट मिळावी म्हणून ही नवी युक्ती कळाली मला....त्या चार मुली आणि मी असे पाच जाणी आतमध्ये दोन्ही सीटच्या आत बरोबर मावलो. त्या चार मुलींपैकी एकीने समोर असलेल्या बुरखाधारी महिलेला अगदीच अॅटीट्यूडमध्ये विचारलं, ''व्हेअर यु गेट डाऊन....?'' आता त्या बुरख्यामध्ये स्वतःच्या अस्तित्वाला गुंडाळणाऱ्या त्या महिलेला इंग्रजीत समजलं असेल की नाही कुणास ठाऊक....(मला त्यांना कमी लेखायचं नाहीये. अनुभवावरून म्हणतेय) त्या महिलेने मुलीकडे तिरक्या नजरेने बघत तिला टाळले. कारण माहित नाही. काही वेळानंतर पुढच्या स्टेशनवर त्या चारही मुलींना दुसरीकडे सीट मिळाल्या. त्या रो मध्ये आता मीच राहीली एकटी. त्या बुरखाधारी महिलेने त्या मुलीला का टाळलं असेल बरं ? हा प्रश्न वर असलेल्या पंख्यांप्रमाणे माझ्या मनात घरघरत होताच. मनात एक कारण येत होतं, पण मला त्याची खात्री करायची होती. मग मी ही उभ्या उभ्या एक ट्राय मारला. मी बीडची असल्यामुळे मुस्लिम बांधवांची भाषा माहितीच होती. मी त्या बुरखाधारी महिलेला विचारलं, ''खाला आप कहॉं उतरोगी...'' त्या महिलेने एक छानशी स्माईल देत म्हणाली, ''बेटा कुर्ला उतरनेवाली हुॅं... आप बैठ जाओ मेरे उतरनेके बाद....!'' तिच्या या उत्तरानंतर माझ्या मनात जी शंका होती ती खरी ठरलीच... पण आपल्या मुस्लिम भगिनींना फक्त 'खाला' बोलल्याने त्या आपल्या इतक्या जवळ येतात, तर आपण त्यांना का इतक्या तिरकस नजरेने पाहतो, असा प्रश्न पडला.