‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे ‘पैठणी’ ही महिलांचे आकर्षण ठरली आहे. या कार्यक्रमात आपला सहभाग असावा, असे प्रत्येक महिलांना वाटते. त्यासाठी त्या प्रतीक्षा देखील करत राहतात. लोढा हेवन परिसरातील प्रत्येक महिला व मुलींची ही इच्छा पुर्ण करण्यासाठी प्रत्येक सोसायट्यांमध्ये ‘होम मिनीस्टर’चा खेळ आयोजित करण्यात आला होता.
गेल्या १०-१२ वर्षांपासून होम मिनिस्टर या कार्यक्रमातून महाराष्ट्रासह सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. खास महिला वर्गासाठी असणार्या या कार्यक्रमाद्वारे महिलांतील विविध कलागुणांना वाव देण्याचे काम होत आहे. होम मिनिस्टरला प्रतिसादही अमाप मिळत असून या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी महिलावर्गाला वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. परंतू काही महिलांची या खेळामध्ये निवड होत नाही आणि मग त्यांची निराशा होते. निराश झालेल्या अशा महिलांच्या चेहर्यावर आनंद आणण्यासाठी लोढा हेवन परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये होम मिनिस्टरचा खेळ आयोजित करण्यात आला होता. सायं. ४ च्या सुमारास लोढा हेवन येथील चंद्रेश ओयासिसच्या सी आणि जी बिल्डींगच्या परिसरात सर्व महिला एकत्र जमल्या होत्या. कार्यक्रमाच्या पद्धतीनुसार खेळ व स्पर्धेचे विविध टप्पे पार पडले. यावेळी संगीत खुर्ची, लिंबु चमचा स्पर्धा अशा विविध स्पर्धा महिला व लहान मुलांसाठी घेण्यात आल्या. यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या पैठणीचा मान प्रमिला पवार हीने पटकाविला. तर दुसर्या क्रमांकाची पैठणी रिता तिवारी व तिसर्या क्रमांकाची पैठणी रोहिणी नेवासे यांना प्राप्त झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोर गपाट यांनी केले असून उपस्थित सर्व महिलांचे मनोरंजन करून खेळीमेळीचे वातावरण निर्माण करून केले होते.

No comments:
Post a Comment