जेव्हा एका स्त्रीचा नवरा दारू पिऊन घरी आल्यावर काय दंगा करतो आणि घरातील मुलांच्या नजरेत बेवड्या बापाचा काय तमाशा होतो, हे मंत्रालयातील खुर्चीवर बसून दारूबंदी करणे शक्य नाही, असे उत्तर देणार्यांना काय माहित? ‘‘ गावातील इतरांप्रमाणं माझे बाबाही दारू पितात. आईनं कष्टानं कमवलेले पैसेही जबरदस्तीनं दारूसाठीच खर्च होतात. आमच्या भविष्याचं काय?’’ असा प्रश्न विचारताना जेव्हा चिमुरड्यांच्या डोळ्यात अश्रु येतात, त्या अश्रुंची कहाणी या दारूबंदी नाकारणार्या मंत्र्यांना काय माहित? अनेक घरात वडिल कामावरून घरी येण्यापुर्वी शांतता पसरते. का तर....आता वडिलांची कामावरून घरी येताना दारू पिऊन येतील आणि आपण काही चुकीचे वागलो तर आपल्याला फटके बसतील, कधी कधी तर नशेत मेणबत्तीचे चटकेही मिळतील...म्हणून ती शांतता...पण त्या शांततेचा आवाज राजकीय टिका करण्यात व्यस्त असणार्या दारूबंदी नाकारणार्या मंंत्र्यांच्या कानी कधी पोहोचणार आहे काय?
हिवाळी अधिवेशन सुरू आहे...आज खेडोपाड्यातील अनेक महिला कधी टि.व्ही.कडे ढुमकूनही न पाहणार्या त्या महिला दारूबंदीची घोषणा ऐकण्यासाठी हिवाळी अधिवेशन पहात आहेत. कारण या दारूपायी या गावातील अनेक घरांची धूळधाण झालीय. अनेक संसार देशोधडीला लागलेत. अनेक महिलाचं कुंकू पुसलं गेलं तर अनेक म्हातार्यांनी आपला कर्तासवरता मुलगा या व्यसनापायी गमावलाय. शालेय जीवनातील कोवळं वय असणारी १५ ते २० वयोगटातील मुलं आता चक्क दारूच्या अधीन झालीत. आई-वडिलांना रोज शिवीगाळ, दारूसाठी पैसे मागणं आणि नाही दिले तर मारहाण इतक्या खालच्या थराला ही मुलं गेलीत. इतकंच नाही तर या दारूसोबतच आता गुटखा, सिगारेट, मटका, जुगार, पत्ते या सर्व गोष्टींकडंही तरुण पिढी वळताना दिसतेय. पण दारूच्या व्यवसायाने लाखोंची कमाई करून दारूबंदीला नाकारणार्या त्या मंत्र्याला काय देणंघेणं?
जेव्हा रात्रीच्या वेळीस एखाद्या नाक्यावरून एक मुलगी एकटी घरी जाते आणि त्या नाक्यावर असलेल्या दारूच्या दुकानांवर बाटल्या हातात पकडून उभ्या असलेल्या त्या दारूड्यांच्या नजरा काय बोलतात हे अधिवेशनात बसून दारूबंदी नाकारणार्या त्या मंंत्र्याला काय समजणार? शेवटी एकच...दारूबंदी झाली नाही तर बाकी उरेल ती अनेक संसारांची राखरांगोळी.....

No comments:
Post a Comment