तो सध्या काय करतो??? माहित नाही....झालंय काय, त्याला ना कसली तरी जाणीव झालीये. त्याला स्वत:लाच प्रश्न पडतायत खूप सारे, आता ही जाणीव नेमकी तरी कसली ? मी त्याला कळलीय की नाही ? मुळात कळलीय की कळाल्याचा त्याला भास होतोय ? कशामुळे आहे ही जाणीव ? आणि मलाच का ? त्याला होते का ?
तो सध्या काय करतो??? माहित नाही....झालंय काय, हल्ली तो त्याच्या जगामध्ये बिझी झालाय. कदाचीत त्याच्यासोबतच्या जगण्यात सुख शोधणार्या तिचा जरा विसर पडलाय.....तिला स्वत:ला प्रश्न पडतायेत खुप सारे....तो तिच्यापासुन हळुहळु दुरावतोय का? दुरावत असेल तर त्याला असंच आपल्या आयुष्यातुन निसटुन द्यावं का? की आपल्या सहवासाच्या दोरीने घट्ट बांधुन ठेवावं....पण, जरा यात जर त्याचा दम कोंडुन घुसमट होउ लागली तर? मी केलंय ते नेमकं बरोबरे का ? हे मीच घडवून आणलंय का परिस्थितीने हे घडवून आणलंय ? असंच होणार होतं तर मग आधीचं काय होतं ? कशासाठी ?
तो सध्या काय करतो??? माहित नाही....झालंय काय, एका छोट्याश्या कारणामुळे दोघांमध्ये खुप मोठ भांडण झाल....पण यावेळी मात् त्याने मनात काही निराळं ठरवलं होतं... ती त्याला सॉरी बोलुन त्याची समजुत काढण्याचा प्रयत्न करत होती....त्याला हसविण्याचा प्रयत्न करीत होती....पण तो काही शांत होत नव्हता....ती त्याला लागोपाठ कॉल करत होती....पण तो नियमाप्रमाणे उचलत नव्हता....तो सारखा चिड चिड करत होता....त्याला भांडण मिटवायचं होतं....पण त्याच्यामध्ये जरा ॲटीट्युड आला होता....पण ती कॉल करणं थांबवत नव्हती....
तो सध्या काय करतो???? माहित नाही....झालंय काय, त्यांनी एक निर्णय घेतलाय. पण प्रश्न असा पडलाय, हे बरोबर आहे ना ? की चूक आहे ? नाही नाही, चूक-बरोबर नाही. योग्य आहे का हे ? की अयोग्य आहे ? आपण एकमेकांना गमावु का ? की काय ?
तो सध्या काय करतो??? माहित नाही, झालंय काय, तो आलाय त्याच्या आवडत्या ठिकाणी. एकटाच. निवांत. बघतोय सगळीकडं. हातातल्या घड्याळाचा सेकंदकाटा ज्या गतीने फिरतो त्या गतीने तो सगळीकडं पाहतोय. डोळे मिटतो. डोळे उघडतो. आरशात पाहतो. आणि स्वत:शीच एक गोड हसतो. आता कोणता प्रश्न नाही. हीच ती जाणीव. सगळ्यांनाच होते ! पुन्हा एकदा आरशात पाहतो आणि एक मोठा सुस्कारा सोडतो.