आज का कोण जाणे....
खुप आठवतोस...
पावसातला तु...
कुठे असशील?
काय करत असशील....माहित नाही!
पण पावसाच्या प्रत्येक थेंबाबरोबर
तुझ्या-माझ्या पावसातल्या त्या आठवणी
भिजल्या असतील हे मात्र नक्की....
बरसत्या प्रेमाच्या सरी
वीजेच्या कडाटण्याने तुला बिलगलेली मी
एकाच छत्रीत जाताना
छत्रीवरच्या पाण्याने मला थेंबांनी भिजवताना तु
आज मी अलिप्तपणे उभी आहे बोलक्या खिडकीत
पाउस येतो...जातो....थांबतो....
तो त्याच कर्तव्य अगदी निर्जीवपणे बजावतोय
तु ही असशील कुठल्या तरी खिडकीत
ते टपोरे दवबिंदू झेलत
अजुनही तितकाच हळवा होत असशील तु
आठवणीने भरलेल्या डबक्यात आजही पाहते
पाउस...तुझ-माझं नातं आणि पावसातला तु!!!
No comments:
Post a Comment