नमस्कार !!! ..बर्याच दिवसानी आवतरतेय आज .. अर्थातच एका नव्या उपक्रमाच्या निमित्ताने ..गेले काही दिवस सगळ ध्यान तिकडेच होते ..तेच आज तुमच्यापुढे सविनय सादर करत आहे ..एक अविनाशी ''झेप''…
एक अविनाशी ''झेप''… मागची माझी भुमिका
तर गेली जवळपास ३-३.५ वर्षे या पत्रकारितेच्या विश्वात मी वावरत आहे ...पडले ,धडपडले ,पुढे गेले ...सगळी काही झाले .. हे सगळ करताना मित्र परीवारही वाढत गेला . काही खुप छान संधी मिळाल्या. अशाच बर्याच ठिकाणी चर्चा,गप्पांमध्ये पत्रकारितेच्या विश्वाबाबत चर्चा सुरु असायची..आणि त्यातुन एक मुद्दा पुढे यायचा की . हे इ-जग अधीक छान करण्यासाठी काय काय करता येईल ? अर्थात प्रत्येकाची मते वेगळी असायची ...

पण मला स्वतःला असे वाटते की महाराष्ट्राची अस्मिता, मराठी भाषा, महाराष्ट्राची संस्कृती तसेच परंपरांना केंद्रबिंदू मानून या सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या मराठी तरूणांना हक्काचे व्यासपीठ मिळाले पाहीजे. आणि त्यातुन अवतरले ते एक अविनाशी ''झेप''…
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि युवक- युवतींना उच्च-शिक्षण, शेती, आरोग्य, क्रीडा, सामाजिक आणि राजकीय विषयांवर सहकार्य करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविला जात आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या बालपणापासून कोणत्या ना कोणत्या गोष्टीची, कलेची, क्षेत्राची आवड ही असतेच. त्यातील काही विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगभूत कला व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ मिळते व त्या विद्यार्थ्यांना त्यांची आवड लक्षात येता आवडीनुसार करिअर करू लागतात. ग्रामिण भागातील काही विद्यार्थी असेही आहेत की ज्यांना आपल्या कला व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ मिळत नसल्याने त्यांची आवड ही करिअरमधून
हरवून जाते. अशा अनेक विद्यार्थ्यांना एक हक्काचे व्यासपीठ या मासिकाच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत. दैनंदिन जीवनामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर, वाचन संस्कृतीचा विकास याद्वारे ग्रामविकासाची संकल्पना मनात ठेऊन नवे पाऊल ठेवले आहे. अर्थातच कोणताही व्यावसायिक फायदा मिळवण्याचा उद्देश नाही .
कवितेच्य गावा या सदरांमधुन विविध विचारवंत आणि कवी आपल्याला भेटतीलच वाचकाला एक सर्वांगीण मेजवानी देण्याचा प्रयत्न केला आहे ..आपल्याला तो आवडेल अशी आशा वाटते ...
तुम्हा सर्व मित्र मैत्रिणीची साथ कायम सोबत होती आणि आहे ..ती तशीच कायम राहील या खात्रीसह हा अंक तुमच्यापुढे रुजु करत आहे अंकाबाबत ,लेखांबाबत असणार्या सर्व मत मतांतरांचे स्वागत आहे. यासाठी आमचा email id आहे ekavinashijhep@gmail.com.
शेवटी एकच पहिल्या अंकाची धावपळ ,समारंभाची प्रीपोन झालेली तारीख यामुळे तुम्हा सर्व मित्र आणि मैत्रिणी च्या संपर्कात येत नाही याबाबत माफी असावी…
शेवटी एकच पहिल्या अंकाची धावपळ ,समारंभाची प्रीपोन झालेली तारीख यामुळे तुम्हा सर्व मित्र आणि मैत्रिणी च्या संपर्कात येत नाही याबाबत माफी असावी…
आपली विश्वासू,
प्रमिला पवार
प्रमिला पवार
No comments:
Post a Comment