आज दररोजच्या प्रमाणे ऑफीसला जाण्यासाठी निघाले...घराबाहेर पडले तर थंडगार वार्याची झुळूक माझ्या भेटीला आली गुड मॉर्निंग म्हणाली...मी ही तिला गुड मॉर्निंग म्हणाली. काही अंत पुढे चालल्यावर आपसुक वर पाहीले तर ढगाळ आकाशाने माझ्या डोक्यावर आशिर्वादाचा हात पसरविला होता. त्यांचा आशिर्वाद घेतला आणि बस स्टॉपवर उभी राहीली बसची वाट बघत! तितक्यात पावसाच्या सरींनी एक सुखदायक स्पर्श केला. कळंना तर्हा पावसाची अशीकशी, नको तेव्हा कोसळून केली वाटमारी, आता जणू मृगातही भोगी कुठे अंधारी, गोष्ट पावसाची ही न्यारी...
एकदाची ती बस आली...बस मोकळी पाहून मोकळा श्वास घेतला. इतका आनंद शतक पुर्ण झाल्यानंतर विराटलाही झाला नसेल... शीळफाटा-महापे सारखा घाटासारखा वाटणारा प्रवास आणि कानात हेडफोन टाकून एफएमवर लागलेली रोमँटीक गाणी...अहा! काही वेळानंतर एक मुलगी माझ्या सीटच्या बाजूला येऊन बसली. तिने हळूच तिच्या बॅगेतील एक पुस्तक काढले आणि निमूटपणे वाचायला लागली. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लिहीलेल्या नावानुसार ते पुस्तक लोकसेवा आयोग परिक्षेचे होते. त्यात जिल्हाधिकार्याची कार्यप्रणाली आणि बरंच काही ती शांतपणे वाचत होती. गेल्या काही दिवसांपासून मी माझ्या एक अविनाशी ‘झेप’ मासिकाच्या ‘महिला दिन विशेषांका’वर काम करीत असतानाच आज त्या मुलीची जिल्हाधिकारी बनण्यासाठीची चिकाटी पाहून खुप आनंद झाला. बसमध्ये पुढच्या स्टॉपवर एक पुरूष आणि छोटूकली-गोंडस मुलगी चढली. बसमध्ये त्यावेळी गर्दी झाली असल्याने ती छोटीशी मुलगी आमच्या सीटच्या बाजूला उभी राहीली आणि ती बसच्या धक्क्याने कुठे पडू नये यासाठी तिला घट्ट धरून तिचे वडील उभे राहीले होते. जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणार्या त्या मुलीने उभी असलेल्या त्या छोट्याश्या मुलीकडे एकदा पाहीले आणि पुन्हा आपल्या अभ्यासाला लागली. त्या छोट्याश्या मुलीला बसविण्यासाठी आपल्याकडून काही मदत होईल का? हा विचार ती करेल, ही अपेक्षा मी त्या विद्यार्थीनीकडून करीत होते. पण अखेर माझा अपेक्षाभंग झाला. शेवटी मी माझ्या सीटवर सरकून थोडी जागा केली आणि त्या छोट्याश्या मुलीला बसविले. आपल्याला बसायला मिळणार हे पाहून त्या छोट्याश्या मुलीचा चेहरा आनंदाने फुलला...आणि त्या वडिलांच्या चेहर्यावर समाधान...
काय वाटतं तुम्हाला जिल्हाधिकारी होण्यासाठी फक्त अभ्यास करून परिक्षेत पास होणे इथेच संपते का? की सुरू असलेल्या तोंडी परिक्षेत अचानक जन-गण-मन हे राष्ट्रगीत सुरू झाले की लागलीच ताठ उभे राहीले म्हणजे तो व्यक्त जिल्हाधिकारी झाला असे आहे?
No comments:
Post a Comment