आज सकाळी दररोजच्या प्रमाणे चहा घेताना पेपर वाचण्याऐवजी टि.व्ही. चॅनेल लावले. म्हटलं ‘अच्छे दिन’ची कोणती गुड न्यूज पहायला मिळते की नाही ते...नवी मुंबई महापालिका निवडणूक झाल्या, महापौर निवडून आले, सल्लुची बेल झाली, नंतर त्याचे कागदपत्र टाईप करताना मध्येच काय ते कार्टातील लाईट गेली, नंतर अनेक राजकीय नेत्यांच्या सल्लुसोबत भेटी-गाठी झाल्या, रविंद्र पाठक यांच्या लढ्याला सलामही केला, मुंबईतील कळबादेवी इमारतीला आग लागली, त्यात दोन जवानांना आपला जीव गमवावा लागला...म्हटलं आता कुठे तरी काही तरी चांगले ऐकायला-पहायला मिळेल...पण आमचं काही नशीब नाही राव गुड न्यूज ऐकायचे...आमच्या महाराष्ट्राचे माननीय अर्थराज्यमंत्र्यांनी चक्क बियर बारचे उद्घाटन केले...ज्या महाराष्ट्रात शेतकर्यांच्या आत्महत्या सुरू असताना त्यांच्यासाठी विशीष्ट उपक्रमाचे उद्घाटन करण्याची गरज असताना चक्क बियर बारचे उद्घाटन केले जाते. सध्या सगळीकडे बियर बार बंद करण्याची गरज असताना चक्क बियर बारचे ओपनींग केले जाते आणि ते महाराष्ट्र राज्याच्या अर्थराज्यमंत्र्यांच्या हस्ते....‘‘काय रे देवेंद्रा....काय चाललंय तुझ्या राज्यात? म्हणे ‘अच्छे दिन’ येणार आहेत...आता बियर बारचे उद्घाटन करून नगरमधील संसार उद्वस्त करून तेथील स्त्रियांना ‘अच्छे दिन’ दाखविणार आहात की काय?’’
No comments:
Post a Comment