दुष्काळामुळे राज्यात पाणी टंचाईचे संकट गहिरे होत असताना या वर्षाची होळी आणि धुळवड सणांत पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचतीचा संकल्प विविध स्तरांतून व्यक्त केला जात आहे. अशातच आपण पाण्याचे फुगे, भरलेल्या पिचकार्या आणि भिजकी धम्माल कशी काय करू शकतो राव! म्हणूनच होळीत होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी दै. धावते नवनगरने पाणी बचतीबाबत जनजागृती करण्याचे ठरविले. यालाच सकारात्मक प्रतिसाद देत नवी मुंबईतल्या अनेक तरूण-तरूणींनी व सोसायट्यांनी दिलेल्या प्रतिक्रीया... विथ बायलाईन
जरी मी पत्रकार असली तरी आहे तर सामान्य नागरिकच ना...आता पत्रकार आहे म्हटल्यावर प्रश्न पडणं हे सहाजिकच आहे. दररोजचं जीवन जगताना आजुबाजूला काही ना काही घडतचं असतं. काही घटना मनाला पटण्याजोग्या असतात..तर काही मनात विचारांचे काहूर माजवतात...हे विचारांचे काहूर वाचनीय असतीलच असे नाही....पण ते व्यक्त होणे गरजेचे...नाही का? म्हणूनच म्हणतेय...प्रमिला म्हणे...