My Blog List

Tuesday, 15 September 2020

#Design तर तेच करतो जे आम्हाला बघायचं असतं!!!

 #WWW च्या जगात #Programming ची 

जादू तू दाखवत असतो...

10 बोटांवर नाचवणाऱ्या #Computer सोबत

#Coding मध्ये तू बोलत असतो....

#JDK ( Java Development Kit) मध्ये आयुष्यभराचे #Solutions तू भरवत असतो... 

जेव्हढं लाईफ पार्टनर निवडायला वेळ घेत नाही 

त्याच्या दहा पट एका प्रोजेक्टला 

वेळ द्यायला पण हिम्मत लागते भावा... 

अशा कितीही तुझ्यात #Error असल्या तरी #Design तर तेच करतो जे आम्हाला बघायचं असतं!!! 


ℍ𝕒𝕡𝕡𝕪 𝔼𝕟𝕘𝕚𝕟𝕖𝕖𝕣𝕤 𝔻𝕒𝕪 !!!


✍️©️ प्रमिला_म्हणे 


#HappyEngineersDay2020 #engineerslife #ComputerEngineers #engineering #PramilaMhane #प्रमिला_म्हणे

Sunday, 21 June 2020

...आणि बाप मात्र राबत राहिला...!!!

अख्या देशाला ज्याने '#लॉक' केलं
#कोरोना म्हणतात त्याला

रक्ताच्या #नात्यालाही दारापुढं अडवलं
सोशल #डिस्टन्सिंग म्हणतात त्याला

रोजंदारीच्या चिरा सोसलेल्या हाताला
साबणाचा फेस आला

कोण, कुठल्या देशातून आलेल्या या छोट्याश्या विषाणूनं
पट्टी लावलीय तोंडाला
पण लेकराच्या पोटासाठी
#बाप मात्र राबत राहिला....
बाप मात्र राबत राहिला...!!!

आज #वडिलांचा हात डोक्यावर आहे म्हणून कुणापुढे मला हात जोडायची वेळ नाही आली !!!

त्या सर्व बापाना माझा #सलाम ज्यांनी गरीब परिस्थितही मुलीला शिक्षण दिलं आणि स्वतःच्या पायावर उभं केलं!!!

🄷🄰🄿🄿🅈 🄵🄰🅃🄷🄴🅁'🅂 🄳🄰🅈

✍️ #प्रमिला_म्हणे
.
.
.
.
.
.

#fathersday2020   #बापमाणुस   #daddysgirl
#fatherslove  #familybonding #बापदिवस #myquotes #पप्पा #पप्पांची_परी
#instamood #instadaily #Fathers #बाप_तो_बाप_असतो


Saturday, 20 June 2020

....म्हणून सूर्य उगवायचं कधी सोडत नाही!

#चंद्र चमकला म्हणून काही #सूर्य बुडत नसतो
आणि थोड्यासाठी #ग्रहण लागलं म्हणून
सूर्य #उगवायचं कधी सोडत नसतो ......

✍️ प्रमिला_म्हणे

 #solareclipse2020    #प्रमिला_म्हणे
 #solareclipse     #ringoffire   #dombivil #डोंबिवली #myquotes
#सूर्यग्रहण #कंकणाकृती #GoldanRingOfFire


Thursday, 11 June 2020

दलित सुरक्षित राहतील का? हा प्रश्न तेव्हाही होता आणि आताही तोच प्रश्न आहे...

काही दिवसांपूर्वी #अरविंद_बनसोड, आणि आता #विराज_जगताप...फक्त जातीपलीकडे प्रेम केलं म्हणून लोखंडी रॉड डोक्यात घालून हत्या

गेल्या काही वर्षांत शिरसगाव, खैरलांजी, सोनई,जवखेडा, खर्डा, नामांतर दंगल ते आतापर्यंत.....गाव आणि दलितवस्ती यांच्या दरम्यान खूप काही गोष्टी सतत घडत असतात. येताजाता टोमणे मारणं, घालून पाडून बोलणं, चारचौघांत अपमान करणं, गावातल्या कार्यक्रमांपासून हेतूतः दूर ठेवणं, सत्तेचा वापर करून प्रत्येक गोष्टीत अडवणूक करणं...जातीय अहंकाराचा जाळ मनात सतत धगधगता ठेवला जातो. त्यात प्रेमप्रकरणाचा सुगावा लागला की धडा शिकवण्याची तयारी सुरू होते. ठेचून काढण्याची मानसिकता पिकलेल्या फोडासारखी ठसठसू लागते आणि एकदम विस्फोट होतो. पण या स्फोटाचे ध्वनी सगळीकडे पसरतात ते बाहेरची माणसं वस्तीवर येऊन गेल्यानंतरच. त्याच्या पडसादानंतरच यंत्रणा हलू लागते. खैरलांजीच्या अत्याचाराला किती दिवसांनी वाचा फुटली हे सर्वांना ठाऊक आहे. देवपूर आणि खर्डा त्याला कसं अपवाद असेल?

#बौद्ध आणि मागास जातींतील नव्या पिढीत निर्माण झालेली प्रगतीची महत्त्वाकांक्षा पिढानपिढ्या सवर्णाचा माज चढलेल्या सरंजामी सरदारांना व्यथित करत आहे. 

#दलित सुरक्षित राहतील का? हा प्रश्न तेव्हाही होता आणि आताही तोच प्रश्न आहे...फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊन दलितांच्या मतांचा सत्तेसाठी वापर करून घेणारे हे राजकीय दलाल घटनास्थळी भेटही देतील, हत्येचा तपास फास्ट ट्रॅकने चालवा अशा सूचना देऊन #दलित_अत्याचाराबाबत डोळ्यावर कातडे ओढून घेतील...दलितांवर कितीही आणि कसलेही अत्याचार करा ओ, काही बिघडत नाही आपलं, सत्तेत आपलेच भाईबंद खुर्ची गरम करत बसलेले असतात, एका कॉलवर हत्येची आत्महत्या करता येते, असा एक वाईट संदेशच या गिधाड्यांमध्ये पेरला असल्यामुळे इतक्या वर्षांनंतरही दलित सुरक्षित आहेत का? हा प्रश्न जशाच्या तसाच आहे.  या जातदांडग्यांना प्रशासनाच्या उदासीनतेतूनच मानवताद्रोही राक्षसी मनोबल मिळतंय आणि त्यातून दलित्यांच्या हत्या होतात हे उघड आहे. #खैरलांजीपासून ते आता अरविंद बनसोड हत्याप्रकरण पर्यंत बहुतांश घटनांमध्ये शोषणकर्ते हे कुठे ना कुठे #राजकीय पक्षाशी गणगोत सांगणारे असल्याचे वेळोवेळी दिसून आलंय. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांच्या जोडीला रिपब्लिकन नेत्यांची सेटिंगगिरी, समाजवाद्यांची उदासीनता, डाव्या पक्षांची केवळ हजेरीपुरती उपस्थिती, मुजोर शासन, आळशी आणि असंवेदनशील प्रशासन, कासवाच्या गतीची न्यायपालिका आणि जातीपातीचा सरंजामी माज असा हा जीवघेणा चक्रव्यूह आहे.

#दलितांची हत्या करणाऱ्या या गिधाड्यांनी आता क्रौयाची परिसीमा गाठली आहे, तात्पर्य काय? तर राज्यकर्त्यांना दलित, आदिवासी, मागासवर्गीय समाजाच्या सुखदु:खाबद्दल काही देणे राहिलेले नाही. त्यांना फक्त या समाजाची मते हवी असतात. एरव्ही त्यांचे अस्तित्वही त्यांना नको असते. म्हणून राज्यकर्त्यांची ही बेफिकिरी इथे दिसून येते.

आपल्यातला दलित खासदार, आमदार मंत्री संत्री जेव्हा स्टेजवर शपथ घेतो तेव्हा त्याच्यासमोर कितीतरी दलित हे आता तरी आपल्या दलितांसाठी अच्छे दिन येतील अशी आशा डोळ्यात ठेवून कडाकड टाळ्या वाजवतो, पण हेच मंत्री संत्री दलितांच्या अत्याचाराबाबत साधा जाहीरपणे निषेधही करत नाहीत.

अरविंद बनसोड,आणि विराज जगताप हत्या प्रकरणात गृहमंत्री लक्ष घालणार आहेत का नाही? की आरोपी जातभाई तसेच आपल्याच पक्षाचे कार्यकर्ते म्हणून हेही प्रकरण दाबून टाकणार? या सगळ्या गोष्टीतून दलितांनी आता एक धडा घ्यायला हवा. उद्या राजकीय भाकऱ्या भाजण्यासाठी कोणताही राजकीय नेता हा आपल्या झोपडीत आला तर त्याला त्याची जागा दाखवा, आणि जशी दलितांच्या मृत्यूची किमंत त्यांना नाही तशी आम्हालाही तुमची किमंत नाही...

:- प्रमिला_म्हणे

#JusticeForArvindBansod 
#JusticeForVirajJagtapage20 
#DalitLivesMatter
#प्रमिला_म्हणे

Friday, 1 May 2020

पप्पा! जसं तुम्ही आमच्यापर्यंत कधी संकटं येऊ दिली नाहीत, तसं तुमच्यापर्यंत कोरोनालाही येऊ देऊ नका!

जेव्हा सुरवातीला कोरोना आपल्याकडे प्रवेश करू लागला, तेव्हा असं वाटलं होतं की काही दिवसांचाच तर प्रश्न आहे, पण नंतर नंतर जस जशी मृत्यूच्या संख्या डोळ्यापुढे भिरभिरु लागल्या, लॉकडाऊन पुढे वाढतच राहिला हे सगळं पाहून मनात हळूहळू भीती वाटायला लागली. लॉकडाऊनमध्येही अनेकजण Morning Walk साठी बाहेर पडत असताना माझ्या वडिलांचा पहाटे 4 वाजता Morning Walk सुरू व्हायचा, पण तो ड्युटीवर जाण्यासाठी.... खरं तर तेव्हापासून पप्पांबद्दल लिहिण्याची खूप इच्छा होती. आज नेमका कामगार दिन!!! मग शेवटी नाही राहवलं.... आज मनातले शब्द ओळींमध्ये उतरवल्याच....


जेव्हा कोरोना सुरू झाला तेव्हा आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव मला एक पत्रकार म्हणून होतीच, पण माझ्यातल्या मुलीने सुरवातीला तुम्हाला "कामावर जाऊ नका, बाहेर कोरोना किती वेगाने पसरतोय, कशाला रिस्क घ्यायची, कामात सांगा, तब्बेत बरी नाही, मस्त घरी आराम करा", अशा बऱ्याच विनवण्या केल्या. केवळ लिहिता वाचता येईपर्यंतच शाळा बघितलेल्या माझ्या पप्पांनी यावर जे उत्तर दिलं त्यामुळे थोडा धीर तर मिळाला. "मुंबईची डोकेदुखी ठरणारा 'कचरा' या समस्याचा आम्ही सुपडासाफ करू शकतो, मग हा कोरोना काय चीज आहे ? " तुमचं हे उत्तर ऐकलं आणि तुम्ही कामावर स्वतःची स्वतःची काळजी घ्याल असा विश्वास तर झाला, पण काळजी अजूनही अधूनमधून फेरफटका मारतेच. तुमचा 'कामगार दिन' तर गेल्या किती तरी वर्षापासून सुरूच आहे तो आतापर्यंत....मला जसं कळतंय तसं तेव्हापासून पहाटे 4 वाजता उठून डोंबिवली ते सायन असा ट्रेनमध्ये कधी स्टँडिंग तर कधी फोर्थ सीट हा प्रवास जणू तेव्हापासून पाचवीला पुजलेलाच... "तुमचे वडील बीएमसी कर्मचारी आहे, सातव वेतन, सुट्ट्या असतात, मजा असते बीएमसी वाल्यांची!!!" असं खूप जण अनेकदा मस्करीत बोलायचे. पण जेव्हा लॉकडाऊन सारखी परिस्थिती, त्यात उठता बसता
कोरोनाची भीती, दोन महिन्यापासून ना घर पाहिलं ना घरच्यांना, अशा परिस्थितीतही रस्त्यावर उभं राहून ड्युटी करणं, अशा तुमच्या या स्पिरिटला सलाम आहे. एक बाप म्हणून तर आतापर्यंत तुम्ही आमच्यापर्यंत कधी संकट येऊच दिली नाहीत, तसंच घरदार सोडून मुंबईत राहून रस्त्यावर कोरोनाशी दोन हात करताना त्या कोरोनाही येऊ देणार नाहीत, हा विश्वास आहे मला. आतापर्यंत घरच्यांच्या सुखासाठी आणि आम्हा सर्वांना हवं नको ते सगळं मिळवुन देण्यासाठी तुम्ही झटत आलात. पण मुंबईवर आलेल्या कोरोनाच्या संकटात तुम्ही तुमची मायेची ओढ बाजूला ठेवत आज रस्त्यावर उन्हातान्हाचं उभं राहून ड्युटी करताय... तुमचे हात जर थांबले तर उरलं सुरलं शहर ही अडचणीत येईल याचा विचार तुम्ही केलाय खरा, पण इथे घरात खंबीर बापाची कमतरता भासतेय खूप... दिवाळी असो किंवा दसरा, ईद असो किंवा नाताळ वर्षभरातील कुठल्याही सणोत्सवातही शहरात स्वच्छता राखण्याचे काम इमानाने करणारे कर्मचारी म्हणजे घंटागाडीवरील कर्मचारी. दाराशी घंटागाडी रोजच्या वेळेपेक्षा काही मिनिटे उशिरा आली तरीही अनेकांकडून उशीर झाल्याबद्दल प्रश्न उभे राहतात. एखाद्या दिवशी गाडी येऊच शकली नाही तर दुसऱ्या दिवशी नागरिकांना तोंड देताना या कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येतात. पण करोनासारख्या संकटातही तुम्ही शहरातील नागरिकांची साथ सोडलेली नाही. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार, सेवा ठप्प झाल्या आहेत. पण अशाही परिस्थितीत आपली भूमिका ओळखून जिवावर उदार होऊन तुम्ही शहराच्या आरोग्यासाठी सैनिकासारखी लढत आहात....


करोनाच्या बातम्यांनी मन सैरभैर केल्यानंतर आता राहून राहून मनात भरपूर प्रश्न येतायेत. तुम्हाला ड्युटीवर असताना सॅनिटरायझर तर मिळत असेल ना, तुम्हाला तिन्ही टाईमचं जेवण तर मिळतंय ना, आणि जर बीएमसी कडून जेवण नाही पोहोचलं तुम्हाला तर आता रस्त्यावरही काही खायला सुरू नाही, Hotel पण बंद आहेत, मग असंच उपाशी तर झोपत नाहीत ना ? राहण्याची सोय तर ठीक केलीये ना? मच्छर भरपूर चावत असतील. अंगावर गोधडी ही नसेल. अशा सगळ्या वातावरणात तुम्ही तितक्याच हिमतीने कोरोनाशी लढा देताय. हे सगळं पाहून फक्त एकच म्हणावसं वाटतंय!!! तुम्ही खरे कोरोना योद्धा आहात!!! एक वडील म्हणून तर यशस्वी आहातच, पण एक 'कोरोना योद्धा' म्हणून तुम्हाला मनापासून मनाचा मुजरा!!!

तुमची मुलगी
प्रमिला

#Lockdown
#Coronavoriors
#DutyFirst
#BMCEmlpoyee
#LoveUPappa
#Salam_Pappa
#Corona
#कोरोना_योद्धा
#कामगार_दिन_2020
राजेंद्र लक्ष्मण पवार (बीएमसी कर्मचारी) 

Saturday, 1 February 2020

सांगा त्या वहीखात्यात आमच्यासाठी किती कोटी ?



मित्र-मैत्रिणींनो, काल दिवसभर बजेट बघत होती...खरं तर सकाळी नाश्त्याला ब्रेडसाठी जास्त पैसे लागतील म्हणून घरच्यांना चहा चपातीचा नाश्ता करणारी एक महिला, तर ग्रामीण भागात पहाटे 4 पासून शेतात राबल्यानंतर काळ्या मातीत पिकाची सोनं पाहून सुखावणारी महिला या दोन्ही व्यक्ती या बजेटला कसं पाहत असेल? हा विचार मनात आला. आणि विचार करता करता सवयीप्रमाणे त्या ओळीत उतरल्या... प्रयत्न केलाय कविता करण्याचा... किती जमलंय माहीत नाही. पण केलाय.




आमच्या घरी ना गाडी नी घोडी
हा...पण रस्त्यांची दुरुस्ती हवी होती थोडी
आकडे पाहिले टीव्हीवर लैच बडीबडी...
सांगा त्या वहीखात्यात आमच्यासाठी किती कोटी ? 


गावात इंटरनेटचं जाळं बनवणारेय 
आमच्याच गावातली एक बाई बोलत होती
इंटरनेट चालवायला गावात थोडी लाईट हवी होती
सांगा त्या वहीखात्यात आमच्यासाठी किती कोटी ?


गावातून किसान रेल योजना सुरू होणार 
टिव्हीवरची एक बाई बोलत होती 
कर्ज फेडता फेडता माह्या पोराचं नाय बरं...
ती तुमची शेतकरी योजनाच झाडावर फाशीचा झोका खेळत होती...
सांगा त्या वहीखात्यात आमच्यासाठी किती कोटी ?


इवली इवली बाळं, न जाणे किती ती भुकेली होती
तुमची कुपोषण योजनाच कुपोषित झाली होती
देवच जाणो, खात्यातले पैसे कुणासाठी पोषित होती
सांगा त्या वहीखात्यात आमच्यासाठी किती कोटी ?



निसर्गाची भाषा समजणारे, वाऱ्यावर जगणारे आदिवासी
ज्याला प्रकृतीची भाषा समजली पण तुमचं बजेट काही समजले नाही 
पालातल्या पालात रोज बलात्काराचं मरण ही पाहत होती
सांगा त्या वहीखात्यात आमच्यासाठी किती कोटी ?


मुलाच्या शिक्षणासाठी डोनेशनची जुळवाजुळव करत होती 
शाळेचा कॉर्पोरेट टच पाठीवरच्या दप्तराला जड वाटत होती
रोजगाराच्या संधी गावाच्या वाटेवरून हरवत होती

सांगा त्या वहीखात्यात आमच्यासाठी किती कोटी ?

#प्रमिला_म्हणे #बजेट2020 #महाराष्ट्र #शेतकरी #आदिवासी #BUDGET2020 #maharashtra

Friday, 23 August 2019

बनले असते मी ही राधा, पण ???



बनले असते मी ही राधा, पण कृष्णा भेटला नाही...
अश्रूने भिजलेल्या मोरपंखाने डोळे अजूनही मिटले नाही,
आहे अनय साथीला, पण 'कृष्णा'वलेली ती जखम पुन्हा ओली झाली नाही,
बनले असते मी ही राधा, पण कृष्णा भेटला नाही...


तुझ्यासोबतचा पुरेपणाशी वायदा आजही विसरत नाही,
निळ्या प्रेमातल्या अनयच्या ऊबदार वास्तव्याला तोड मात्र नाही,
राधा.... कधी कृष्णाच्या बरोबरीची, कधी कृष्णा पेक्षा कितीतरी मोठी असणारी...
बनले असते मी ही राधा, पण कृष्णा भेटला नाही....
एक बासरीची धून होती, दुसरी अनयबरोबर वाहून गेलेली राधा होती....
तशीच उभी... काष्ठवत ! कोरड्या डोळ्यांनी पाठमोऱ्या जाणा-या अनय कडे बघत होती...
राधेची गर्द निळी ओढणी फडफडत होती...
पण आता कृष्णाची ओढ ही बसुरीपुरतीच होती...
तुझ्या ओढीने यमुने तीरी आले खरी,
पण ना तू आलास, नाही तुझी बासरी...
बनले असते मी ही राधा, पण कृष्णा भेटला नाही...


कृष्णाला जितकी रुक्मिणी मिळाली,
तितकी अनयला राधा मिळाली नाही,
बनले असते मी ही राधा, पण कृष्णा भेटला नाही....
बनले असते मी ही राधा, पण कृष्णा भेटला नाही....
-प्रमिला पवार

#प्रमिला_म्हणे
#Janmashtami2019 #RadhaKrishna #राधा #कृष्ण #जन्माष्टमी