My Blog List

Friday, 23 August 2019

बनले असते मी ही राधा, पण ???

बनले असते मी ही राधा, पण कृष्णा भेटला नाही...
अश्रूने भिजलेल्या मोरपंखाने डोळे अजूनही मिटले नाही,
आहे अनय साथीला, पण 'कृष्णा'वलेली ती जखम पुन्हा ओली झाली नाही,
बनले असते मी ही राधा, पण कृष्णा भेटला नाही...

तुझ्यासोबतचा पुरेपणाशी वायदा आजही विसरत नाही,
निळ्या प्रेमातल्या अनयच्या ऊबदार वास्तव्याला तोड मात्र नाही,
राधा.... कधी कृष्णाच्या बरोबरीची, कधी कृष्णा पेक्षा कितीतरी मोठी असणारी...
बनले असते मी ही राधा, पण कृष्णा भेटला नाही....
एक बासरीची धून होती, दुसरी अनयबरोबर वाहून गेलेली राधा होती....
तशीच उभी... काष्ठवत ! कोरड्या डोळ्यांनी पाठमोऱ्या जाणा-या अनय कडे बघत होती...
राधेची गर्द निळी ओढणी फडफडत होती...
पण आता कृष्णाची ओढ ही बसुरीपुरतीच होती...
तुझ्या ओढीने यमुने तीरी आले खरी,
पण ना तू आलास, नाही तुझी बासरी...
बनले असते मी ही राधा, पण कृष्णा भेटला नाही...

कृष्णाला जितकी रुक्मिणी मिळाली,
तितकी अनयला राधा मिळाली नाही,
बनले असते मी ही राधा, पण कृष्णा भेटला नाही....
बनले असते मी ही राधा, पण कृष्णा भेटला नाही....
-प्रमिला पवार

#प्रमिला_म्हणे
#Janmashtami2019 #RadhaKrishna #राधा #कृष्ण #जन्माष्टमी

No comments: