एक अविनाशी ‘झेप’ मासिकाचा आरोग्य विशेषांकाचा प्रकाशन सोहळा डोंबिवली वुमन्स वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. स्वाती गाडगीळ व झी चोवीस तास वाहिनेचे असोसिएट प्रोड्यूसर अमोल परांजपे यांच्या हस्ते पार पडला. ‘झेप’ मासिकाचे प्रकाशन केल्यानंतर यंदाच्या अंकात ‘झेप’ मासिकाने विचारलेल्याा रोखठोक सवालाचे उपस्थित सर्व प्रेक्षकांनी तोंडभरून कौतूक केले.
एक अविनाशी ‘झेप’ मासिकाने उत्तुंग भरारी घेण्यास सुरवात केली आहे. याचेच यशस्वी पाऊल उचलून एक अविनाशी ‘झेप’ मासिकाचा जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आरोग्य विशेषांकाचा प्रकाशन सोहळा डोंबिवलीतील रोटरी भवन हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. तसेच नवोदित पत्रकारांसाठी डोंबिवलीतून पहिल्यांदाच सुरू होणार्या इंडियन न्यूज रिपोर्टर सेंटरचे उद्धाटन झी चोवीस तास वृत्तवाहिनीचे असोसिएट प्रोड्यूसर अमोल परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘झेप’ मासिकाच्या आरोग्य विशेषांकाचा प्रकाशन सोहळा आणि इंडियन न्यूज रिपोर्टर सेंटरच्या उद्धाटनाच्या निमित्ताने जणू कल्याण डोंबिवलीती सर्व पत्रकांराचा मेळावाच भरला होता. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रमूख पाहूणे अमोल परांजपे व डॉ. स्वाती गाडगीळ यांचा एक अविनाशी ‘झेप’ मासिकाचे कार्यकारी संपादक नितीन सोनवणे यांच्या हस्ते फुलपुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. एक अविनाशी ‘झेप’ मासिकाच्या सहसंपादक नमिता दोंदे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. यावेळी डॉ. स्वाती गाडगीळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना इंडियन न्यूज रिपोर्टर सेंटर हे भावी काळात विवेकी पत्रकार घडवून समाजातील अनेक समस्यांना वाचा फोडतील, अशी आशा व्यक्त केली. ‘संकल्पनांना मार्ग दाखविणारी नवी दिशा, नवा ध्यास’ असे ब्रिदवाक्य असणार्या एक अविनाशी ‘झेप’ मासिकाने वाचकांची मने जिंकून वाचकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे शोधणारे एक अविनाशी ‘झेप’ मासिक अशीच ओळख निर्माण केली असल्याचेही गाडगीळ यांनी सांगितले. त्यानंतर सर्व वाचक वर्ग ज्या उत्सुकतेसाठी एकवटले होते असा एक अविनाशी ‘झेप’ मासिकाचा आरोग्य विशेषांक डॉ. स्वाती गाडगीळ आणि अमोल परांजपे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. मासिकाचे प्रकाशन झाल्यानंतर उपस्थित सर्व वाचकांनी ‘झेप’ मासिकाने ‘शासकीय रूग्णालयांची अवस्था खालावतेय का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे कौतूक केले. त्यानंतर एक अविनाशी ‘झेप’ मासिकाच्या संपादक प्रमिला पवार यांनी आपल्या भाषणात आरोग्य क्षेत्रातील अनेक समस्यांचा उलगडा केला. तसेच कल्याण, डोंबिवली, ठाणे व मुंबईतील वाचकांची स्तुतीसुमने प्राप्त केल्यानंतर आता संपुर्ण महाराष्ट्रातील वाचकांची मने जिंकण्यासाठी ‘झेप’ टिम सज्ज झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘झेप’ मासिकाच्या उत्तुंग भरारीत महत्वाचे योगदान असलेले सहसंपादक नमिता दोंदे व कार्यकारी संपादक नितीन सोनवणे, वितरक जनक सोनवणे यांच्या अथक परिश्रमाचे कौतूक केले. त्यानंतर अमोल परांजपे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, ‘‘कणसाचा एक दाना स्वतःला आधी जमिनीत गाडून घेतो व त्यानंतर पुर्णपणे कणिस तयार होते, त्याप्रमाणे चांगल्या कामासाठी स्वतःला आधी झोकून देणार्या ‘झेप’ टिमच्या कार्याचे कौतूक केले. तसेच इंडियन न्यूज रिपोर्टर सेंटरच्या उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी माध्यम क्षेत्राबाबत मार्गदर्शनही केले. अखेरीस इंडियन न्यूज रिपोर्टर सेंटरचे सुरेंद्र यादव यांनी सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी दिपक जाधव, सागर नरेकर, रसिका जोशी, संतोष पाठक, वृषाली गोखले, संदिप सामंत आदि माध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ‘झेप’ मासिकाचा आरोग्य विशेषांक विक्रीसाठी प्रत्येक स्टॉलवर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी ९७०२३१७१३३ ८०९७७२८०९७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
एक अविनाशी ‘झेप’ मासिकाच्या आरोग्य दिन विशेषांकाचे प्रकाशन करताना ‘झेप’ मासिकाच्या संपादक प्रमिला पवार, डॉ. स्वाती गाडगीळ, झी चोवीस तासचे अमोल परांजपे, सुर्या फाऊंडेशनचे सुरेंद्र यादव |
No comments:
Post a Comment