काही दिवसांपुर्वी एक रणरागिणीने रौद्र रूप धारण करून तिची छेड काढणार्या एका मुलाला आपल्या स्टाईने धडा शिकवीत पोलिस स्टेशनमध्येच धुलाई करतानाचा व्हिडीयो सर्व प्रसार माध्यम, व्हॉट्सऍप आणि फेसबूकवर दाखवित होते. खूप बरं वाटलं. कारण एखादा मुलगा आपली छेड काढतोय म्हणून इतर मुली आपली वाट वदलताना दिसतात, तर त्यांची छेडछाड सहन करताना दिसतात. अशा रोडरोमियोंची छेडछाडीची मर्यादा काही दिवसांनी ओलांडते आणि मग काही मुली आत्महत्येचा मार्ग स्विकारतात. त्या रणरागिणीचे हे रौद्र रूप पाहून अशा मुलींनी धडा घेतला पाहीजेच. पण मनात एक खंत राहीली की काही प्रसार माध्यमांनी तिचा व्हिडीयो प्रसारित करताना तिचा चेहरा ब्लर केला. आता यामागे काही तात्विक कारण असुही शकते किंवा तिच्या सुरक्षेबाबचेही कारण असू शकते. पण मी काय म्हणतेय...त्या रणरागिनीने मोठ्या धाडसाने त्या रोडरोमियोला धडा शिकविला. मागचा पुढचा विचार न करता भर पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांसमोर त्याची पिटाई केली. हे कौतुक करण्याजोगेच आहे. मग का नाही दाखवू नये त्या रणरागिणीचा चेहरा?
No comments:
Post a Comment