My Blog List

Thursday, 31 December 2015

'पुरस्कार'मय वाटचाल २०१५ ची.....

नवीन वर्ष नवीन सुरुवात... ३६५ पानांची नवीन वही परत एकदा उघडुन श्रीगणेशा करायचा... नवीन रस्ते नवीन वाटा काबीज करत नवनवीन ध्येये गाठायची... दर वर्षीच हे होते .... १ जानेवारीला नवीन वर्षाचे स्वागत करुन या वर्षी काहीतरी वेगळे करायचे हे ठरवतो व काही so called resolutions सुद्धा करतो...

वर्षे जातात अन् येतात... काळ काही थांबत नाही... शेवटचा दिवस आला की मग वर्ष भराचा हिशोब लावायला सुरुवात होते... जुनी आणि जीवाभावाची नाती तुटतात.. त्याची उणीव पुर्ण करण्यास नवीन नाती आयुष्यात येतात..जुने ते सोनंच असते असे बरेच वेळेस वाटते.... नवीन नात्यात आपण जुना गोडवा शोधण्यास जातो आणि काही वेळेस मृगजळच हाती लागते... पण म्हणुन काही आयुष्य थांबत नाही... आणि वेळही नाही... ते तसेच चालु रहाते, किंवा राहु द्यावे लागते... नवीन गोष्टीच्या स्वागतासाठी व नवीन सुखाच्या शोधासाठी...

तसे माझ्याबाबतीतही झाले... २०१५ ने मलाही असे बरेच काही दिले...मागच्या वर्षभरात खुप काही घडले... खुप नवीन ठिकाणे फिरले ...बरेच नवीन मित्र मिळाले तर काही जुने दुर गेले... नवीन गोष्टी शिकण्यास मिळाल्या आणि काही राहूनच गेल्या...

पत्रकारिता क्षेत्र हे काय आहे हेच माहिती नसणारी आज मी पत्रकारिता क्षेत्रात इतकी रुळले की २०१५ ने मला खुप सर्प्राइझ दिले.... आदर्श महिला पत्रकार पुरस्काराने.... माझ्या आयुष्यातला हा पहिलाच पुरस्कार होता. पण माझ्या तब्बेतीने साथ दिली नाही आणि त्या पुरस्कार सोहळ्यात प्रत्यक्ष जाऊन पुरस्कार स्विकारणे जमले नाही. एक महिना केईएम हॉस्पिटलमध्ये घालविल्यानंतर पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात केली आणि त्यावेळी ठरवलेच होते...आयुष्यातील पहिला पुरस्कार प्रत्यक्ष स्विकारणे जमले नाही म्हणून काय झाल? हा काही शेवटचा पुरस्कार नाही. २०१५ हे वर्ष माझ्यासाठी पुरस्काराचे वर्ष ठरले अस म्हटले तरी चालेल....नुकताच नवनिर्मिती फाउंडेशन तर्फे जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्कार देणार्यांचा उद्देश जरी चांगला असला तरी माझ्या सारख्या अनुभवाने आणि वयाने लहान असणाऱ्या मुलीला जीवनगौरव पुरस्कार हे गणित मला पटले नाही आणि मी त्या पुरस्कारासाठी नकार दिला. माझ्या मतांचा मान राखून अखेर त्यांनी मला जीवनगौरव पुरस्कारा ऐवजी आदर्श महिला पत्रकार पुरस्कार २०१५ जाहीर केला.
वर्षाची सुरुवात एकदम छान एक अविनाशी झेप मासिकाच्या प्रकाशनाने झाली..was one of the best days of life... खुप सारी स्वप्ने पुर्ण झाली... २०१५ च्या प्रवासात कविवर्य अशोक बागवे, पहिल्या महिला Brandguru जान्हवी राऊळ यासारख्या अनेक मान्यवरांसोबत प्लॅटफॉर्म शेअर करण्याची संधी मिळाली. अनेकानी कौतुकही केले ..... सर्वांच्या कौतुकात एकच वाक्य .... लहान वयात खुप मोठी झेप घेतली आहे... पण मला अस वाटत झेप घेण्यासाठी फक्त उडण्याची जिद्द हवी.... बाकी नंतर तर आकाश ही आपल्याला मिठीत घेते.... २०१५ ने जशा चांगल्या गोष्टींचे सर्प्राइझ दिले तसे अनेक वाईट घटनांचे देखील सर्प्राइझ दिले. तर काही इच्छा अधुर्‍याच राहील्या...

नवीन वर्षात ह्याच अधुर्‍या गोष्टी पुर्ण करायच्या आहेत.. नवीन मित्र मिळवायचे आहेत.. नवनवीन ठिकाणे explore करायची आहेत..आजपर्यंत तुम्हा सर्व मित्र आणि मैत्रीणींच्या प्रेमामुळे आणि सहकार्याने नव्या वर्षाची सुरुवात आणखी एका नव्या उपक्रमाने करणार आहे. हा उपक्रम लवकरच मी आपणासमोर आणणार आहे. ज्याप्रमाणे २०१५ या वर्षात तुम्ही सर्वानी मला फेसबूकच्या माध्यमातून माझ्यावर प्रेम करत आला आहात त्याचप्रमाणे येणार्या २०१६ वर्षात त्यापेक्षा जास्त प्रेम कराल हीच एक अपेक्षा....
तुमचेही असेच काहीतरी ठरले असेल नं.. तेव्हा त्यासाठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा...हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना समाधानाचे, सुखसमृद्धीचे व भरभराटीचे जावो हीच ईश्वराचरणी प्रार्थना....
हसा खेळा मस्त जगा...
आयुष्य सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवा...
pramilamhane.blogspot.com

Sunday, 20 December 2015

वाहनांच्या मागे लिहिलेल्या पाट्या आणि वाहनचालक.....

अनेकदा आपण प्रवास करताना वाहनांच्यामागे लिहिलेल्या पाट्या वाचण्यात येतात. यातील काही विनोदी असतात तर काही वाक्य हे प्रवासातील आनंद देणारे असतात.... तर काही वाक्यांतुन आयुष्याची उकल दिसुन येते. पण जे जे वाक्य ज्या ज्या वाहनावर लिहिले त्यानुसार त्या त्या वाहनचालकाचे निरीक्षण कधी केलय का?.... 

जर एखाद्या वाहनावर लिहिले असेल की, 
बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने! तो वाहनचालक हमखास गाडी चालविताना ओव्हरटेक करेलचआणि ओव्हरटेक केल्यानंतर मागच्या वाहनचालकाने जास्त नखरे केले तर आहेच मागची पाटी 'ओव्हरटेक केलय वाघाने' आता मागचा वाहनचालक वाघापुढे काय गुरगुरणार? 
साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस....असे वाक्य जरी एखाद्या वाहनचालकाने त्याच्या गाडीवर लिहिले असले तरीही मध्येच रस्त्यावर एखादा अपघात झालेला पाहुन त्याठिकाणाहुन हळूहळू गाडी चालवित तो अपघात पाहुनच तो पुढे जाईल.... पण जखमीला मदत करण्याची रिस्क तो घेणार नाही... 
अं हं. घाई करायची नाही तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही, असे वाक्य लिहिलेला वाहनचालक नक्कीच सिग्नल मध्ये उभा असुन सुध्दा लागोपाठ हॉर्न वाजवताना दिसेल....
सासरेबुवांची कृपा..... असे ज्या गाडीवार लिहिले असेल ते वाचून त्या गाडीच्या वाहनचालकाने नक्कीच श्रीमंत घरची बायको केली असणार किंवा ती गाडी त्याला हुंड्यात मिळाली असणार.... असा विचार तुमच्या डोक्यात येतोच ना....
तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं..माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं याचा विचार करून गाडी चालवा.....आणि जर तोच वाहनचालक स्पीड ब्रेकरवरुन दणादण गाडी आपटून जात असेल तर ..... आतली माणसे किती लाख मोलाची असतात याचा अंदाज येतोच की.... 
भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे"....... हे वाक्य वाचुन मागचा वाहनचालक बिचारा घाबरतो आणि त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो.... पुढे जाणाऱ्या गाडीवर लिहिलेल असत.... तुमचे लक्ष आमच्याकडे का?
बाकी पुण्यातील दुचाकी स्वार हे म्हणजे अजब प्रकरण आहे. एरवी ऑफिसात वगैरे अगदी नम्रपणे वागणाऱ्या व्यक्ती सुद्धा जेव्हा दुचाकीवर स्वार होतात तेव्हा त्यांच्या अंगात काय वारं संचारतं कोण जाणे! बहुतेक दुचाकीच्या वेगाने ह्यांच्या पार डोक्यात वारं घुसत असावं. कारण हेल्मेट वगैरे घालणं हे भ्याडपणाचं लक्षण समजलं जातं ना! 
रिक्षामध्ये जीव केवढासा, पण शेजारून जाणाऱ्या सुमोशी वेगाची स्पर्धा करतील. अचाट आत्मविश्वास! आणि ह्यांची खासियत म्हणजे एखाद्या सिग्नलला पार डाव्या लेन मध्ये उभे असतील, पण सिग्नल सुटायच्या वेळी काय एकदम विचार बदलतील आणि चक्क उजवीकडे वळणार. बाकीचे वाहनचालक कितीही शंख करत असतील तरी बेहत्तर. बर रिक्षाचा एवढा सूळसुळाट आहे तरी तुम्हाला काही कामासाठी रिक्षा हवी असेल तर आजिबात मिळणार नाही. कोठ्ल्याश्या स्टॅण्ड वर रिक्षा लावून हे सगळे चकाट्या पिटत बसणार.
एखादा धूर्त “कुंपणावरचा” कार्यकर्ता त्याच्या गाडीवर “साहेबांची कृपा” लिहील. आता साहेब हे सर्व पक्षात आहेत त्यामुळे ह्या पठ्ठ्याची निष्ठा गुलदस्त्यात. ह्यांना आपली गाडी म्हणजे रणगाडाच वाटतो. आणि ह्यांची गाडी सरळ लाईनीत कधीही जाणार नाही. सारखे लेन बदलणार. जणूकाही गाडीत डीझेल बरोबर रात्री नं संपलेली “देशी” पण मिसळलेली आहे. आणि खुशाल चुकीच्या बाजूने गाडी चालवतील. तेही गाडीचे डोळे वटारून, म्हणजे हेडलाईट लावून. आणि पोलिसांचा सुद्धा ह्यांच्याकडे कानाडोळा. बिचारे म्हणत असतील, “न जाणो खरच कुठल्या दादांची कृपा असेल तर आपली बदली व्हायची!”

Thursday, 10 December 2015

...हे त्या दारूबंदी नाकारणार्‍यांना काय माहिती?

जेव्हा एका स्त्रीचा नवरा दारू पिऊन घरी आल्यावर काय दंगा करतो आणि घरातील मुलांच्या नजरेत बेवड्या बापाचा काय तमाशा होतो, हे मंत्रालयातील खुर्चीवर बसून दारूबंदी करणे शक्य नाही, असे उत्तर देणार्‍यांना काय माहित? ‘‘ गावातील इतरांप्रमाणं माझे बाबाही दारू पितात. आईनं कष्टानं कमवलेले पैसेही जबरदस्तीनं दारूसाठीच खर्च होतात. आमच्या भविष्याचं काय?’’ असा प्रश्‍न विचारताना जेव्हा चिमुरड्यांच्या डोळ्यात अश्रु येतात, त्या अश्रुंची कहाणी या दारूबंदी नाकारणार्‍या मंत्र्यांना काय माहित? अनेक घरात वडिल कामावरून घरी येण्यापुर्वी शांतता पसरते. का तर....आता वडिलांची कामावरून घरी येताना दारू पिऊन येतील आणि आपण काही चुकीचे वागलो तर आपल्याला फटके बसतील, कधी कधी तर नशेत मेणबत्तीचे चटकेही मिळतील...म्हणून ती शांतता...पण त्या शांततेचा आवाज राजकीय टिका करण्यात व्यस्त असणार्‍या दारूबंदी नाकारणार्‍या मंंत्र्यांच्या कानी कधी पोहोचणार आहे काय?
हिवाळी अधिवेशन सुरू आहे...आज खेडोपाड्यातील अनेक महिला कधी टि.व्ही.कडे ढुमकूनही न पाहणार्‍या त्या महिला दारूबंदीची घोषणा ऐकण्यासाठी हिवाळी अधिवेशन पहात आहेत. कारण या दारूपायी या गावातील अनेक घरांची धूळधाण झालीय. अनेक संसार देशोधडीला लागलेत. अनेक महिलाचं कुंकू पुसलं गेलं तर अनेक म्हातार्‍यांनी आपला कर्तासवरता मुलगा या व्यसनापायी गमावलाय. शालेय जीवनातील कोवळं वय असणारी १५ ते २० वयोगटातील मुलं आता चक्क दारूच्या अधीन झालीत. आई-वडिलांना रोज शिवीगाळ, दारूसाठी पैसे मागणं आणि नाही दिले तर मारहाण इतक्या खालच्या थराला ही मुलं गेलीत. इतकंच नाही तर या दारूसोबतच आता गुटखा, सिगारेट, मटका, जुगार, पत्ते या सर्व गोष्टींकडंही तरुण पिढी वळताना दिसतेय. पण दारूच्या व्यवसायाने लाखोंची कमाई करून दारूबंदीला नाकारणार्‍या त्या मंत्र्याला काय देणंघेणं?
जेव्हा रात्रीच्या वेळीस एखाद्या नाक्यावरून एक मुलगी एकटी घरी जाते आणि त्या नाक्यावर असलेल्या दारूच्या दुकानांवर बाटल्या हातात पकडून उभ्या असलेल्या त्या दारूड्यांच्या नजरा काय बोलतात हे अधिवेशनात बसून दारूबंदी नाकारणार्‍या त्या मंंत्र्याला काय समजणार? शेवटी एकच...दारूबंदी झाली नाही तर बाकी उरेल ती अनेक संसारांची राखरांगोळी.....

Monday, 16 November 2015

चातुर्वर्ण्य व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र सरकारने सफाई कामगारांच्या नियुक्तीमध्ये वारसा पद्धत कायम ठेवत तो अनुसूचित जातीतील सर्व जातींना लागू करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो सकृतदर्शनी जाती व चातुर्वण्यव्यवस्था बळकट करण्यावरचा सरकारी ठप्पा असल्याचे दिसते. वाल्मिकी-मेहेतर समाजासकट इतर जातीना सामाजिक आणि आर्थिक संरक्षण देण्याच्या नावाखाली घेतलेला निर्णय हा धर्मशास्त्रीय सनातनी मानसिकतेचे द्योतक आहे.

४० वर्षापूर्वी लाड समितीने शिफारस केलेल्या वारसा पद्धतिचा तेव्हाच्या सरकारनेच विरोध करावयास पाहिजे होता. त्याने समाजातील विषमतेची दाहकता कमी झाली असती. परंतु तसे झाले नाही. याला सरकारमधील मंत्र्यांची श्रेष्ठ कनिष्ठ मानसिकताच जबाबदार असावी. परंतु आता फडणवीस सरकार त्याही पुढे जावून ही पध्दती कायम ठेवण्यासह वाल्मिकी-मेहतर या जातीसोबतच अनुसूचित जातीमधील इतरानाही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. साफसफाईचे काम केवळ अनुसूचित जातीच्या समाज घटकानीच का करायचे? साफसफाईचे काम करण्यास इतर जातीवर्गांना प्रतिबंध करून ते काम जबरदस्तीने अनुसूचित जातीना करावयास लावणे हे भारतीय घटनेच्या सामाजिक समानता प्रस्थापित करण्याच्या तत्वाविरोधात आहे. उत्तर प्रदेशातील मायावती सरकारने साफ सफाई व अस्वच्छता या नोकरी क्षेत्रातील जागा ह्या सर्व वर्गासाठी खुल्या करण्यात आल्या होत्या.



साफसफाई कामगार पदासाठी विविध जाती समुहातून अर्ज मागविण्यात आले होते व त्यास सर्ववर्गीय समाजातून भरपूर अर्ज प्राप्त झाले होते. परंतु येथे (महाराष्ट्रात) तर सरकारच श्रम आधारित जातीव्यवस्था कायम ठेवण्यास उत्सुक सल्याचे दिसते. हे फार धोकादायक असून याचा विरोध होणे अत्यंत गरजेचे आहे. सरकार कोणाचेही असो त्यांनी नेहमी समाजिक सुधारणा व परिवर्तनाच्या भूमिकेत असले पाहिजे. परंतु हे सरकार सुधारणा करण्याऐवजी धर्म व चातुवर्ण्यव्यवस्था अधिक सुधृढ व बळकट कशी होईल याकामी लागलेले दिसते. अशा सरकारचा आदर कोणास वाटेल? मग या सरकारला सवर्ण व सनातनी लोकांचे सरकार म्हणावे काय?. भारतात जातीव्यवस्था ही श्रम विभागणीचे नाही तर ती श्रामिकाच्या विभागणीचे फळ आहे. डाक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे जातीव्यवस्था ही केवळ श्रमविभाजन अथवा श्रमिकाचे विभाजन नाही तर ती एक उतरंड आहे. यात मजुराचा एक वर्ग दुसऱ्या वर्गापेक्षा उच्च आहे.


दुसऱ्या कोणत्याही देशातील मजुरात श्रमासोबत श्रमिकाचे अशाप्रकारे उच्चनीच श्रेणीत विभाजन झालेले नाही. परंतु भारताच्या धर्मशास्त्रीय व्यवस्थेने ते केले आहे. २१ व्या शतकातही हे असेच चालू द्यायचे काय?. ज्या धार्मिक श्रध्दावर आजच्या मानसिकतेच्या गुढ्या उभारलेल्या आहेत त्या श्रद्धा नष्ट केल्याशिवाय दुषित मानसिकता नष्ट होणे शक्य नाही. सामाजिक गुणवत्ता ठरविण्याकरिता प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्तृत्वास वाव मिळाला पाहिजे. व ज्याला त्याला त्याच्या आवडीनिवडी नुसार कार्यक्षेत्र निवडता आले पाहिजे. या व्यवस्थेलाच जातीव्यवस्थेत हरताळ फासला गेला आहे. यात माणसाची निवड त्याच्या अंगभूत गुणांवरून करण्यात येत नाही तर त्याच्या पूर्वजांच्या व्यवसायावरून ठरविण्यात येते. पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ या सिद्धांतावर ते आधारलेले आहे. जन्मजात लादलेल्या धंद्याची पध्दती ही संपूर्ण समाजास घातक आहे. जातिव्यवस्थेतील हे श्रमविभाजन हे ऐच्छिक नाही, व्यक्तीच्या भाव भावना व आवडी निवडी ह्यांना यात स्थान नसते.

भारतात असे अनेक धंदे आहेत जे जे कनिष्ठ प्रकारचे समजण्यात येतात. त्यामुळे त्या धंद्यातील लोकात आपापल्या धंद्याबाबात घृणा निर्माण होते. ते धंदे सोडण्याची प्रवृत्ती त्यांच्यात वाढीस लागते. किंबहुना तो समाजच असे काम करण्यास स्वत:हून मनाई करतो परंतु सरकारच जबरदस्तीने काम थोपवत जबरदस्ती करीत असेल तर राज्यघटनेच्या समानतेच्या तत्वाविरोधी ठरते आहे. त्यामुळे सामाजिक असमानता कायम ठेवू इच्छीनारा हा निर्णय सरकारने रदबादल करण्याची गरज आहे. अन्यथा अगोदरच सरकारवर पेशवेशाहीच्या आगमनाचे लांच्छन लागल्याचा जो आरोप आहे तो अधिक गढध होवून त्यास या निर्णयाने पुष्टी मिळाल्यासारखेच होईल.

Tuesday, 3 November 2015

‘होम मिनीस्टर’ रंगल्या पैठणीच्या खेळात

‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे ‘पैठणी’ ही महिलांचे आकर्षण ठरली आहे. या कार्यक्रमात आपला सहभाग असावा, असे प्रत्येक महिलांना वाटते. त्यासाठी त्या प्रतीक्षा देखील करत राहतात. लोढा हेवन परिसरातील प्रत्येक महिला व मुलींची ही इच्छा पुर्ण करण्यासाठी प्रत्येक सोसायट्यांमध्ये ‘होम मिनीस्टर’चा खेळ आयोजित करण्यात आला होता.
गेल्या १०-१२ वर्षांपासून होम मिनिस्टर या कार्यक्रमातून महाराष्ट्रासह सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. खास महिला वर्गासाठी असणार्‍या या कार्यक्रमाद्वारे महिलांतील विविध कलागुणांना वाव देण्याचे काम होत आहे. होम मिनिस्टरला प्रतिसादही अमाप मिळत असून या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी महिलावर्गाला वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. परंतू काही महिलांची या खेळामध्ये निवड होत नाही आणि मग त्यांची निराशा होते. निराश झालेल्या अशा महिलांच्या चेहर्‍यावर आनंद आणण्यासाठी लोढा हेवन परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये होम मिनिस्टरचा खेळ आयोजित करण्यात आला होता. सायं. ४ च्या सुमारास लोढा हेवन येथील चंद्रेश ओयासिसच्या सी आणि जी बिल्डींगच्या परिसरात सर्व महिला एकत्र जमल्या होत्या. कार्यक्रमाच्या पद्धतीनुसार खेळ व स्पर्धेचे विविध टप्पे पार पडले. यावेळी संगीत खुर्ची, लिंबु चमचा स्पर्धा अशा विविध स्पर्धा महिला व लहान मुलांसाठी घेण्यात आल्या. यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या पैठणीचा मान प्रमिला पवार हीने पटकाविला. तर दुसर्‍या क्रमांकाची पैठणी रिता तिवारी व तिसर्‍या क्रमांकाची पैठणी रोहिणी नेवासे यांना प्राप्त झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोर गपाट यांनी केले असून उपस्थित सर्व महिलांचे मनोरंजन करून खेळीमेळीचे वातावरण निर्माण करून केले होते.

Wednesday, 21 October 2015

‘सलाम नवदुर्गांच्या कर्तुत्वाला!’

दुर्गा.. दुष्टांचे निर्दालन करणारे देवीचे एक रूप; पण आपल्या अवती भवतीही अशा अनेक दुर्गा आहेत. आपल्या अवतीभवती आपल्याला अनेक दुर्गा दिसतात. त्यातील कोणी अन्यायाच्या विरोधात उभी राहिली आहे, कोणी स्वाभिमानी बाण्याने अत्याचारा विरोधात लढत आहे, कोणी कठोरपणे अन्यायाच्या विरोधात संघर्ष करत आहे, कोणी अथक परिश्रमांनी समाज बदलवून दाखवत आहे, तर कोणी अबलांना सबला बनवीत आहेत. अशा दुगार्ंंंची ओळख समाजाला झाली, तर त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल हा विश्वास असल्यानेच आजवर समाजापुढे न आलेल्या अशा दुगार्ंची माहिती समाजासमोर आणण्यासाठी ‘दै. धावते नवनगर’ ने
‘सलाम नवदुर्गांच्या कर्तुत्वाला!’ हा उपक्रम सुरू केला. 

‘सलाम नवदुर्गांच्या कर्तुत्वाला!’

‘सलाम नवदुर्गांच्या कर्तुत्वाला!’
दुर्गा.. दुष्टांचे निर्दालन करणारे देवीचे एक रूप; पण आपल्या अवती भवतीही अशा अनेक दुर्गा आहेत. आपल्या अवतीभवती आपल्याला अनेक दुर्गा दिसतात. त्यातील कोणी अन्यायाच्या विरोधात उभी राहिली आहे, कोणी स्वाभिमानी बाण्याने अत्याचारा विरोधात लढत आहे, कोणी कठोरपणे अन्यायाच्या विरोधात संघर्ष करत आहे, कोणी अथक परिश्रमांनी समाज बदलवून दाखवत आहे, तर कोणी अबलांना सबला बनवीत आहेत. अशा दुगार्ंंंची ओळख समाजाला झाली, तर त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल हा विश्वास असल्यानेच आजवर समाजापुढे न आलेल्या अशा दुगार्ंची माहिती समाजासमोर आणण्यासाठी ‘दै. धावते नवनगर’ ने ‘सलाम नवदुर्गांच्या कर्तुत्वाला!’ हा उपक्रम सुरू केला. नऊ संघर्षाच्या कहाण्यांपैकी दै. धावते नवनगरमध्ये प्रकाशित झालेल्या माझ्या बायलाईन स्टोरी....

‘सलाम नवदुर्गांच्या कर्तुत्वाला!’


दुर्गा.. दुष्टांचे निर्दालन करणारे देवीचे एक रूप; पण आपल्या अवती भवतीही अशा अनेक दुर्गा आहेत. आपल्या अवतीभवती आपल्याला अनेक दुर्गा दिसतात. त्यातील कोणी अन्यायाच्या विरोधात उभी राहिली आहे, कोणी स्वाभिमानी बाण्याने अत्याचारा विरोधात लढत आहे, कोणी कठोरपणे अन्यायाच्या विरोधात संघर्ष करत आहे, कोणी अथक परिश्रमांनी समाज बदलवून दाखवत आहे, तर कोणी अबलांना सबला बनवीत आहेत. अशा दुगार्ंंंची ओळख समाजाला झाली, तर त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल हा विश्वास असल्यानेच आजवर समाजापुढे न आलेल्या अशा दुगार्ंची माहिती समाजासमोर आणण्यासाठी ‘दै. धावते नवनगर’ ने ‘सलाम नवदुर्गांच्या कर्तुत्वाला!’ हा उपक्रम सुरू केला. नऊ संघर्षाच्या कहाण्यांपैकी दै. धावते नवनगरमध्ये प्रकाशित झालेल्या माझ्या बायलाईन स्टोरी ..........

Wednesday, 26 August 2015

बंध धाग्यांचे पण अर्थ निराळे...

कॉलेजच्या तरुणांमध्ये गेल्या आठवड्यात उत्साह होता तो फ्रेंडशिप डेचा. अनेकांनी अगदी दोन दिवस हा फ्रेंडशिप डे अगदी जोमाने साजरा केला. फ्रेंडशिप बँड बांधून एक अतुट नातं निर्माण केलं जातं. तसंच रेशमी धाग्याची कोमलता घेऊन येणारं अजून एक नातं म्हणजे बहीण-भावाचं. एकीकडे पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करून फ्रेंडशिप डे साजरा केला गेला. तर त्यानंतर आठवड्याभराच्या फरकाने भारतीय संस्कृतीनुसार रक्षाबंधन साज
रं होईल. मैत्रीचं नातं काय किंवा बहीण-भावाचं नातं काय, दोन्ही नात्यांची जाणीव करून देण्यासाठी एकच रेशमी धागा बांधला जातो. या दोन्ही नात्यांचा अर्थ जरी वेगवेगळा असला तरी त्या दोन्ही नात्यात सच्चेपणा आणि विश्वास हा असतोच. अशा रेशमी धाग्यात अडकलेल्या नात्याविषयी.
सध्या सोशल नेटवर्किंग साइटवर एक मेसेज फिरतोय, ‘लास्ट संडे फ्रेंडशिप डे, नेक्स्ट संडे राखी, इस संडे आप लडकी के पिछे, नेक्स्ट संडे लडकी आपके पिछे’. या मेसेजवरून सगळं काही कळतं. एखाद्या मुलीनं मैत्री करावी म्हणून तिच्या पाठीपाठी फिरणार्‍या मुलांसाठी हा मेसेज आहे.  ‘फ्रेंडशिप डे’ला तर व्हॉटस् ऍप, फेसबुक यांसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर तर शुभेच्छांना अगदी उतच आला होता. प्रत्येक जण आपल्या खास मित्राला किंवा मैत्रिणीला, एवढंच नाही तर अगदी तोंडओळख असणार्‍यांनासुद्धा मेसेज, इमेजेस टाकत होते. परंतु कॉलेजिअन्समध्ये फ्रेंडशिप डे असा रंगात आलेला असतानाच त्यांना ‘फ्रेंडशिप डे’नंतर एकाच आठवडयात येणार्‍या रक्षाबंधनाचंही टेन्शन आलं होतं.
अगदी मैत्रीसारखंच अतुट नातं म्हणजे रक्षाबंधन. बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याला उदंड आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना करते. तर भाऊ तिला वचन देत म्हणतो की, ‘‘ मी सदैव तुझी रक्षा करेन. फ्रेंडशिप डे सारखंच यादिवशी देखील हाताला रेशमी धागा बांधून हे नातं अधिक घट्ट बनवलं जातं. पण फ्रेंडशिप डे साजरा करायला उत्सुक असणारी तरुणाई रक्षाबंधनाला तर कॉलेजमधून गायबच होते. सख्खे भाऊ-बहीण हा दिवस आवडीने साजरा करत असले तरी कॉलेजमध्ये जाताना मुलांच्या मनात भीति असते की एखाद्या मुलीने फ्रेंडशिप डेचा बँड बांधते असं सांगून मला राखी बांधली तर काय? मित्राऐवजी थेट मानलेला भाऊच बनवलं तर काय ? या धास्तीने बरेच तरूण दोन दिवस कॉलेजला बंकही करतात. रक्षाबंधनाच्या दिवशी शक्यतो मुलींना टाळण्याकडेच कॉलेजमधील मुलांचा कल असतो. ‘तुच माझा सच्चा दोस्त’ असं सांगणारा तरुणवर्ग रक्षाबंधनाला आपल्या सख्ख्या बहिणीला सोडून कोणासमोर हात पुढे करतच नाही.
पण मुली देखील काही कमी नसतात. एका तरी मुलाला मला भाऊ बनवायचंच आहे, असा निश्चय त्यांनी केलेला असतो. मग अशा एखाद्या मुलाला भाऊ बनवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या त्या लढवतात. फ्रेंडशिप बँडसारखीच दिसणारी ट्रेन्डी राखी आणतात आणि ती राखी त्यांना बांधतात. एकदा का राखी हातात बांधली की त्यांना खरं सांगतात. मुलांच्या त्रासापासून स्वत:ला वाचवण्यासाठी मुली असे किंवा यांसारखे अनेक प्रकार करतात. पण यातले काही तरुण खूपच हुशार असल्यामुळे ते या दिवशी कॉलेज, क्लासच्या आजूबाजूलासुद्धा फिरकत नाहीत. फ्रेंडशिप डेच्या वेळी अंगात उत्साह संचारलेली मंडळी रक्षाबंधनाला कोण जाणे कुठे नाहीशी होतात ! तसं बघायला गेलं तर ही दोन्ही नाती अगदी अतुट आहेत. त्यात जितकं साम्य आहे त्याच्या कित्येकपटीने त्यात फरकही आहेत. भावांसाठी आणि बहिणींसाठी असणारं प्रेम आणि एखाद्या मित्रमैत्रीणीसाठी असणारं प्रेम यात बराच फरक आहे.
पण नातं कोणतही ही असो यात विश्वास, निरागसता, प्रेम, सच्चेपणा आहे आणि तो विसरून चालणार नाही. नातं कोणतंही असो ते टिकवणं महत्वाचं हाच संदेश हे रेशमी धागे देतात. म्हणून तर ही बंधनाची शपथ घातली जाते. पाश्चात्य संस्कृतीचा आपण अवलंब करत असलो तरी आपल्या भारतीय संस्कारांचा आणि विचारांचा तरुणांना विसर पडू नये हे मुलांनाही लक्षात ठेऊन वागावं. आजकाल, ‘मी तुझा मित्र आहे ना !’ असं सांगून कित्येक मुलं मुलींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. या जवळीकीची परिणीती कदाचित त्या मुलीला नकोशा घटनांमध्येही होऊ शकते किंवा तिला अती जवळीक नकोही असेल. पण हेच मित्राला सांगण्यासाठी तिला मग नाईलाजाने रक्षाबंधनाचा आधार घ्यावा लागतो. मैत्रीचं नातं जसं पाण्यासारखं स्वच्छ असावं, तसंच भावाबहिणीचं नातं ही असावं. 

Monday, 17 August 2015

श्रावणी सोमवार, शिव आणि आपण...

आज पहिला श्रावणी सोमवार...श्रावण महिन्यात कुणी आठवड्यातल्या एखाद्या दिवशी उपवास करतात तर काही जणांचा संपूर्ण महिनाभर उपवास असतो... काही जण खास करून सोमवार पाळतात...पण, हा उपवास का पाळतात? या प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत...दै. धावते नवनगरमध्ये आज प्रकाशित झालेल्या माझ्या लेखामधून....

Sunday, 16 August 2015

केईएम...रूग्णांना आधार देणारी जीवंत इमारत!

गेल्या काही दिवसांपासून सततच्या आजारपणामूळे मुंबईतल्या के.ई.एम. ला जवळून पाहण्याची संधी मिळत आहे. मी एक ना एक दिवस बरी होईलच हो...पण अख्ख्या मुंबईकरांना ठणठणीत करणारे के.ई.एम. जणू आधारगृह ठरले याचे कारण मला कळले. सुरवातील माझा खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होता. परंतू तेथे व्यवस्थीत उपचार होत नसल्याने कुटूंबीयांनी मला के.ई.एम. मध्ये उपचार करण्याचे सुचविले. सुरवातीला शासकीय रूग्णालयाच्या बाबतीत अनेक नकारात्मक गोष्टी ऐकून इच्छा नाही झाली. पण तेथे डॉक्टर्स उत्तर उपचार करतात म्हणून के.ई.एम. ची इमारत गाठली. मुंबईतल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्याही गरीब माणसाला त्याच्या आजारपणात मायेनं जवळ घेणार एकमेव ठिकाण म्हणजे केईएम हॉस्पिटल. असे का बोलले जाते याचा अनुभव सध्या मला येत आहे.
गेलं पाउण शतक या वास्तुनं गरीबाला आपलंसं केलं आहे, त्याला कुणाची दुष्ट लागू नये. जवळजवळ साडेपाचशे निवासी डॉक्टर्स असलेलं अठराशे खाटांचं हे हॉस्पिटल दरवर्षी साधारणतः लाखभर रुग्णाना प्रत्यक्ष दाखल करुन घेऊन त्यांच्यावर उपचार करीत असतं. आणि साध्यासुध्या आजारपणासाठी नुसत्या वरवरच्या तपासण्या, इंजेक्शन, औषध-गोळ्या घेऊन जाणार्‍यांची संख्या तर दहा लाखांच्यावर आहे. लांबरुंद पसरलेल्या या दगडी वास्तूला तिचं एक व्यक्तिमत्व आहे. तिची एक ओळख आहे. आरोग्य या अत्यावश्यक आणि कमर्शीअल बनत चाललेल्या सेवेच्या दुनियेत केईएमचा साधेपणाच ग्रेट वाटतो.
आजारी माणूस सहसा एकटा कधीच हॉस्पिटल मध्ये दाखल होत नसतो. त्याच्यासोबत किमान चार-सहा माणसं तिथं हजेरी लावतातच लावतात. म्हणजे केइएम हॉस्पिटलनं कितीतरी माणसांचा जन्मापासून मृत्युपर्यंतचा प्रवास पाहिला असेल. त्या प्रवासातील असंख्य अडथळयांचे डोंगर पाहिले असतील. आजारातून निर्माण होणार्या यातना, दु:ख, भोग अनुभवले असतील. केईएम ही निर्जीव वास्तू आहे म्हणून ठीक अन्यतः त्या वास्तूला जर माणसासारख्या भाव-भावना असत्या तर ती वास्तू कधीच कोलमडून गेली असती. माणसाच्या दु:खाचं महाभारत केईएमनं पचवलं आहे. यापुढेही हा सिलसिला असाच चालत राहणार. रहायला पाहिजे.
दिवसभराचा उकाडा संपून उघडया रस्त्यावर जराशी हवा खेळते आहे. रात्रीचे साडेबारा वाजून गेलेत. केईम समोरच्या सिग्नलचे सगळे दिवे बंद होऊन आता फक्त ऑरेंज रंगाच्या दिव्याची उघडझाप होते आहे. हॉस्पिटलच्या आणि काळोखाच्या पार्श्वभुमीवर ऑरेंज रंग किती भयानक दिसू शकतो. याची कल्पना इथे होते.
केईएमच्या गेट क्रमांक दोननं आत गेल्यावर तिथं एक मोकळी लॉबी आहे. उजव्या बाजूला दिवसरात्र चालणारं केमिस्टचं दुकान. तिथुनच दहा पावलावर ओपिडी. तीही रात्रभर चालू. बाहेरुन आलेला पेशंट तिथं दाखल केला जातो. रात्री अकरानंतरही अधूनमधून कुणी ना कुणी तिथं येतच होतं. आलेल्या प्रत्येक पेशंटला सावरण्यासाठी आठ-दहा माणसं असतात. पण पेशंट बरोबर आत फक्त एकच रहा असं सांगायला सिक्युरिटी,डॉक्टर, काहीवेळेला पोलिसही येतात. हेच सांगणारी दारावर पाटी आहे. पण तिचा काही उपयोग नसतो. यात सगळ्यांचीच दहाएक मिनिटं मोडतात. पण याला इलाज नसतो. शेवटी पेशंटसोबत उरतो तोच त्याच्या जवळचा. बाकीचे सगळे आप्तेष्ठ, सगे सोयरे आणि मित्रपरिवार. जे बाहेर आसपास रेंगाळत राहतात.
त्याच लॉबीत डाव्या बाजूला संयोग गणेश नावाचा गणपती आहे. काहीना विषेशतः पेशंट सोबत येणार्या कार्यकर्त्यांना त्याची माहीती असते. ते त्याच्या पुढयात येतात. पायातल्या पायात चपला-बुट सरकवतात. खडेखडे पाया पडतात आणि निघुन जातात. मग त्याचं बघुन कुणी त्याच्यानंतरही तेच करतात. हे थोडावेळ चालतं. मग पुन्हा शांतता. याच चौकोनी परिसरात रात्री माणसं मारुन टाकल्यासारखी इतस्ततः पडलेली असतात. पिशवीचा- चपलेचा आधार उशाला घेऊन. ते ही न मिळाल्यास हाताच्या मनगटावर डोकं ठेऊन रात्रभर पडून राहतात. मिळालाच तर एखाद्या वर्तमानपत्राचा तुकडा घेऊन तिथंच पसरतात. काही माणसं जागीच असतात. अधुनमधुन एखादी डुलकी. अन्यतः टकटक इकडंतिकडं भांबावल्यासारखी बघत. एखाद दुसरा एकमेकांशी बोलत, गप्पा मारत असतात.
तासा दोन तासानी पंधरा-वीस जणांचा घोळका निशब्द चेहर्यांने ओळीत बाहेर पडतांना दिसतो. ही खुण माणूस गेल्याची असते. काहीच्या डोळयात पाणी तरारलेलं असतं. कुणाचा हात कुणाच्या खांद्यावर असतो. जन्ममृत्युमधला खेळ कुणीतरी कुणालातरी सांगत-समजावत असतो. सगळं संपल्यानंतरची हतबलता किंवा सुटल्याचे भाव एकमेकांच्या चेहर्यावर पसरलेले असतात. त्यातल्याच कुणाचीतरी सराइतपणे पुढची तयारी सुरु होते.
रात्री दिड-दोनच्या दरम्यान एक म्हातारा हॉस्पिटल्च्या मागच्या बाजूस ३१ नंबरच्या खिडकीवर जिथं औषध मिळतात तिथं ठोठावत होता. विचारलं. तर म्हणाला, देखो ना, कोई नही है. खिडकीतला दिवा लागलेला होता. तिथला माणूस जाग्यावर नव्हता. तिथं बहुदा औषध फुकट मिळत असावीत. त्या माणसाच्या नाकातून रक्त गळत होतं, काय झालं असं खुणेनंच विचारलं. तर रडायला लागला. पैसे नाहीत म्हणाला. हातातला केसपेपर, औषधाच्या चिठठया दाखवायला लागला. काय झालं म्हणून पुन्हा विचारलं, तर अर्ध्याकच्च्या मराठी हिंदीत म्हणाला, काळाचौकीतून आलोय, तिथं एक माणूस बायकांसमोर दारु पिऊन अचकट विचकट चाळे करीत होता. याला त्याचा राग आला. म्हणून विचारलं तर त्यानं याच्या अंगावर हातातली बाटली फेकून मारली. डोळा वाचला. नाकाच्या वरती फाटलं होतं. रक्ताचा ओघळ थांबत नव्हता. डॉक्टरनंही मलमपटटी न करताच त्याला इकडं औषध आणायला पिटाळला होता. आणि हा खिडकीवर ठोठावत होता. तो पण प्यायलेलाच होता. त्यामुळे खिडकीवर ठोठावण्याचा वेग आणि आवाज वाढत गेला.
गेटवर गाडी उभी राहिली की गेटसमोरचा आडवा दांडा आपोआप वर येतो. तपासायच्या भानगडीत कुणी पडत नाही. जागोजागी सिक्युरीटी आहे. पण सुस्त. काही अघटीत घडल्याशिवाय यांना कुणी विचारत नाही. त्यामुळे खुर्च्या गरम करीत जो तो आपापल्या जागी बसलेला असतो. सगळ्या मुंबईची सिक्युरीटीची जबाबदारी उत्तरप्रदेशी मुलं सांभाळत असताना इथे सगळे मराठी. हे ही काही कमी नाही.
पहिल्या मजल्यावर लांबचलांब गॅलरीत दोनही बाजूला माणसं पडलेली असतात. अधेमधे लाकडी बाकडी आहेत त्यावरही कुणी झोपलेला असतो. इथं बसल्यावर लक्षात येतं. लाकडी बाकडयावरची माणसं अधुनमधुन वळवळत असतात. आजुबाजुशी बोलल्यावर कळलं की, रात्री ढेकुण जागे असतात. इथल्या शांततेला भंग करणारी एक पाण्याची संततधार खाली पडत असते. हे पडणारं पाणि एसीचं असावं असं वाटतं कदाचित टाकी ओहरफ्लो सुध्दा होत असावी. पण हा आवाज आपल्याला टाळता येत नाही. केईएमचे व्यवस्थापन या आवाजाला का टाळत असावे?
तरुण डॉक्टर्स जिन्सच्या पॅन्टस. सफेद डगला आणि गळ्यात स्टॅथोस्कोप घेऊन इकडून तिकडे. अधुनमधून बाहेर ज्युस सिगरेटी किंवा काही खाण्यापिण्यासाठी फिरत असतात. गरीब पेशंटच्या आजुबाजूला ही गोरी-गोमटी तरुण डॉक्टर पोरंपोरी फारच श्रीमंत वाटतात. या हॉस्पिटलमध्ये येणारे बरेचसे रुग्ण गरीबच असतात, त्यांच्याशी वागण्याची डॉक्टरांची पध्दत पाहिली की कधीकधी अश्या ज्युनीअर डॉक्टरांना फटके का पडतात याची कल्पना करता येते.
नर्सेसची लगभग चालू असते. सिनिअर नर्स फोन आणि खुर्ची सोडत नाही. काहीतरी लिखाण चालू असतं, कुणावरतरी ओरडणं चालू असतं. पण ज्युनीअर इकडे-तिकडे येरझार्या मारीत असतात. त्यातून आया नावाची जमात बिनधास्त वावरताना दिसते. चेहर्यावर तिटकारा आणि तोंडाचा पटटा चालू अश्या अवस्थेत त्या काम करीत असतात. वॉर्डबॉय आपल्याच तोर्यात कानाला हॅन्डस फ्री लाऊन गाणी ऐकण्यात किंवा बोलण्यात दंग असतात. बरेचसे रुग्णांचेच नातेवाईक स्ट्रेचर इकडून तिकडे नेताना दिसतात. हे काम वॉर्डबॉयचं आहे हे कुणी कुणाच्या लक्षात आणून द्यायचं? केइएम परिसरातलं आदिती, ओन्ली फिश, व्हेज ऑलवेज सारख्या चकचकीत हॉटेलच्या तुलनेत मिलन हॉटेल अनेकानां आपलं वाटतं. त्या होटलनं आपला गरीब चेहरा गेली अनेक वर्ष आहे तसाच ठेवला आहे. फुटपाथ पुर्णपणे अडवून बसलेल्या या हॉटेलांनी आजवर कित्तेक महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलिसांचे खिसे गरम केले असतील. त्याचं त्यानाच ठाऊक. अधुनमधुन महानगरपालिकेकडून फुटपाथ साफ केली जातात, अतिक्रमणावर हल्ले केले जातात, पण पुन्हा दुसर्या-तिसर्या दिवसापासनं परिस्थीती जैसे थे.
हॉटलामध्ये जाऊन बसून खाण्याइतपतही ज्यांची ऐपत नाही त्यांच्यासाठी बुर्जीपाव, राईस, पावभाजी च्या गाड्या अगदी कामगार मैदानापर्यंत उभ्या असतात. बारा-पंधरा इंचाच्या तापलेल्या लोखंडी तव्यावर तेल आणि पाण्याचे फवारे चरचरत असताना पाहणं मोठं मजेशीरच. भाजीला आलेल्या उकळ्या आणि बुर्जीला सुटत असलेलं तेल पाहतांना नकळत भुक लागल्यासारखी वाटते. आजपर्यंतच्या माझ्या खानपानाच्या अनुभवात पावभाजी या जोडगळीतले पाव नरमच असतात. इथे एका माणसाने कडक पाव असं म्हटल्यावर मी कुतुहलानं पाहिलं तर. भाजी करणार्या पोरानं पाव पोटात फाडून त्याला उलटा शेगडीला पालीसारखा चिकटवला. पाव दोन मिनटात नरमचा कडक झाला होता. या गाडया बाराच्या पुढे थांबत नाहीत. कारणं तिच. पोलीस वैगेरे. पण नंतर अगदी केईएमच्या दारावरच रात्रभर ऑमलेट बनवणारी बाकडी असतात. पेशंटचे नातेवाईक, पिऊन चुकलेले, भुकेलेले आणि टॅक्सीवाले मात्र यावर तुटून पडलेले असतात. चहा तर असतोच. सिगरेटी, गुटका, तंबाकू यांचीही सोय असते.
केईएमच्या गेटवर निपचित उभ्या असलेल्या ऍम्बुलन्स आपलं चित्त वेधुन घेतात. गर्दीला भेदून रोरावत जाणार्या या अऍम्बुलन्स आता दबा धरुन बसल्यासारख्या वाटतात. ऍन्बुलन्सच्या सफेद रंगावर उलटया क्रमाने लिहिलेली लाल अक्षरे वाचवत नाही. कितीतरी माणसांनी यातच आपला प्राण सोडला असेल. कितीतरी जणानी मृतुनंतर स्मशानापर्यंतचा प्रवास केला असेल.
रात्रीच्या गडद शांततेत एखादी ऍम्बुलन्स भोंगा वाजवत आत शिरते. तेव्हा इथं उभ्या असलेल्या प्रत्येकाचेच डोळे कान टवकारतात. नकळत ऍम्बुलन्सच्या दिशेने माना वळतात. उताणी पडलेला पेशंन्ट. त्याला सावरणारे त्याचे नातेवाईक. लगबघीनं पुढ आणली जाणारी स्ट्रेचर. दोन-पाच मिनिटांचा हा खेळ. पुन्हा जो तो आपापल्या व्यापात. केईएमच्या परिसरात रात्र गजबजलेली नसली तरी जागी असते. कारण कोण, कधी, कसे एन्ट्री आणि एक्झीट घेईल माहीत नसते. त्यामुळे बाकी उरलेल्यांचा जन्म आणि मृत्युच्या मध्ये थांबून टाईमपास चाललेला असतो.

Saturday, 15 August 2015

मराठी रंगभूमीचा आधारवड!

नटवर्य, गायक, नाट्यसंस्था संचालक आदि अनेकविध भूमिकांमधून आयुष्यभर रंगदेवतेच्या सेवेत सतत मग्न असलेले भालचंद्र पेंढारकर ऊर्फ अण्णांनी मराठी रंगभूमीला अलविदा केला. अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, ध्वनिमुद्रण, छायाचित्रण या सर्व क्षेत्रात पेंढारकर यांनी आपला विशेष ठसा उमटवला. अण्णांच्या जाण्याने मराठी रंगभूमीचा आधारवडच कोसळल्याची भावना नाट्यसृष्टी पोरकी झाली खरी पण त्यांच्या अफाट कार्यकर्तुत्वाची कलाकारांना कायमच स्मरण राहील. त्यांच्या या अफाट कार्यकर्तुत्वाचा घेतलेला हा एक आढावा....

‘चलता है’ हा ऍटीट्यूड नको!


सेलिब्रीटींचा स्वातंत्र्यदिन
आज १५ ऑगस्ट म्हणजेच आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्यदिन...आज भारताला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्ष पुर्ण झाली आहेत. स्वातंत्र्यासोबत मिळालेल्या अधिकारांबाबत प्रत्येक भारतीय हा आग्रही दिसून येतो. मात्र, अधिकारांसोबतच भारत देशाप्रति असलेल्या कर्तव्याबाबत ‘चलता है’ हा ऍटीट्यूड ठेऊन नागरिकांमध्ये उदासिनता दिसून येते. अशा प्रतिक्रीया मराठी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रीटींनी दै. धावते नवनगरच्या उपसंपादक प्रमिला पवार यांच्याकडे व्यक्त केल्या आहेत. 

Sunday, 9 August 2015

स्वातंत्र्यदिन औपचारिकता की सोहळा?

१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा होणार... दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी, राजधानी दिल्लीत ध्वजवंदन, परेड होईल...शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल... सगळ्या राज्याची मुख्यालये, पोलीस स्टेशन, शाळा, महाविद्यालये अगदी गल्लोगल्ली तिरंगा फडकवला जाईल... सगळीकडे मोठ्या आवाजात देशभक्तीपर गीते गायली जातील... काही ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले जातील... सगळीकडे सडा टाकून मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातील... महात्मा गांधी , नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग आदी राष्ट्रनेत्यांच्या तसबिरींना हार घालून मानवंदना दिली जाईल...
सिग्नलवर गरीब लहान मुले झेंडे विकतील... तर दुसरीकडे हे झेंडे विकत घेऊन लहान मुले आनंदाने ते फडकवतील... काही उत्साही शर्टाला छोटासा झेंडा लावून मिरवतील... तर काही जण झेंडावंदनाला दांडी मारून स्वातंत्र्यदिनाप्रित्यर्थ मिळणार्‍या सुट्टीचा मुहूर्त गाठून सहलीचं आयोजन करतील..  यावर्षी तर शनिवारची एक रजा टाकली तर सलग दोन दिवसांची सुट्टी एकच दिवस काय ते ऑफीसमध्ये राबायचे तर पुन्हा सलग दोन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे लांबचं पिकनिकही प्लॅन करता येईल. त्या एका दिवसापुरतं का होईना आपला उर देशभक्तीच्या जाज्वल्य अभिमानाने भरून येईल... रोमारोमांत देशप्रेमाने आगळेच स्फुरण चढेल... वातावरणात चैतन्य पसरेल!
पण दुसर्‍या दिवशी वेगळंच चित्र दिसेल.. लोकांची कामाला जाण्याची रोजची पळापळ सुरू होईल... लहान मुले पाठीला दप्तराचे ओझे लाऊन शाळेत जातील... स्वातंत्र्यदिनी दिमाखाने फडकलेला तिरंगा रस्त्यांच्या बाजूला कुठेतरी धूळ खात पडलेला दिसेल... देशभक्तीपर गाणी तशीच हवेत विरुन जातील... देशसेवेच्या शपथा दुसर्‍याच दिवशी विस्मरणात जातील... रेल्वेतून प्रवास करताना जरा धक्का लागला म्हणून एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहिली जाईल... खून, मारामारी, चोरी अशा घटना होत राहतील... घराघरांत स्त्रियांवर अत्याचार सुरूच राहतील... एकूणच काय तर स्वातंत्र्यदिनाची परंपरा कायम राखण्याची औपचारिकता पूर्ण होऊन नेहमीच्याच आयुष्याला सुरूवात होईल... आपल्या आजूबाजूला घडणार्‍या चित्रविचित्र घटनांमुळे स्वातंत्र्याच्या या औपचारिकतेची चीड आल्याशिवाय राहत नाही...
तेलंगण राज्याचे विभाजन करण्याचा निर्णय झाला.. त्याबरोबरच वेगळ्या विदर्भ, मुंबईच्या विभाजनाविषयी चर्चा सुरू झाली... आपल्या संविधानात सर्व जाती-धर्म-भाषा समान आहेत असा उल्लेख आहे. आपल्या प्रतिज्ञेतही आपण सर्व भारतीय माझे बांधव आहेत, असे म्हणतो! मग केवळ भाषेच्या जोरावर वेगळ्या राज्याची मागणी का केली जाते?... एखादी भाषा येत नाही किंवा परजातीय लग्न अशा क्षुल्लक कारणावरुन जातपंचायती बहिष्कार टाकतात... जातपंचायतीच्या जाचाला कंटाळून वडिलांनी गळा दाबून आपल्याच पोटच्या मुलीचा बळी घेण्याची दुर्दैवी घटना घडते... जातपंचायतीच्या मनमानी कारभारावर स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही आळा घालता आलेला नाही... एका बाजूला दुर्गापूजन करुन स्त्रीशक्तीचा गौरव केला जातो, तर दुसरीकडे कित्येक ‘दामिनीं’चा हकनाक बळी जातो... कित्येक सुशिक्षीत कमावत्या स्त्रियांनाही सासरच्या मानसिक दबावाला बळी पडावं लागतंय... राजपथावर स्वातंत्र्यदेवीचे गुणगान गाणारे राजकारणीही विविध मार्गाने लोकांच्या स्वातंत्र्यावर गदाच आणतात... कोणाला महाविद्यालयीन प्रवेशासाठी झगडावे लागते तर कोणाला एखादे शासकीय काम करताना अनंत अडचणीचा सामना करावा लागतो!
स्वातंत्र्य म्हणजे केवळ परदेशी जोखडातून मुक्तता असा अर्थ घेतला जातो... ब्रिटीशांच्या १५० वर्षांच्या पारतंत्रातून भारत मुक्त झाला. एका परदेशी सत्तेचे आपल्यावरील वर्चस्व संपुष्टात आले... मात्र देशांतर्गत विविध घटकांच्या आर्थिक, सामाजिक, मानसिक, राजकीय दबावाचे काय? दरवर्षीचा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा साजरा करण्यापेक्षा अशा अंतर्गत दबावांतून देशवासीयांची सुटका झाली तर तो खरा स्वातंत्र्यदिन ठरेल... गेल्या ६८ वर्षांच्या कालावधीत हे शक्य झाले नाही... मात्र याबद्दल नाउमेद न होता यावर्षी तरी काही आश्वासक, सकारात्मक घडेल अशी आशा बाळगूया... तरच स्वातंत्र्यदिन हा केवळ औपचारिकता न राहता खर्‍या अर्थाने सोहळा होईल...

Sunday, 2 August 2015

गोष्ट त्या हरवलेल्या ‘थ्री इडीयट्सची’...


कॉलेजचा तो पहिला दिवस...सायन्स वर्गातले ते पहिले लेक्चर सुरू झाले. सगळे चेहरे अनोळखी...कोणाशी बोलु हेच काही कळत नव्हतं. बेंचवर बाजुला एक मुलगी बसलेली...मराठी भाषेत बोलत असल्याने आमच्या दोघींचा संवाद वाढला आणि कॉलेजच्या पहिल्या दिवसापासूनच आमच्या नव्या यारीला सुरवात झाली. आम्ही दोघी म्हणजेच उमा आणि मी दोघी दिवसेंदिवस एकमेंकींच्या इतके जवळ आलो की दुसर्‍या कोण्या व्यक्तींच्या साथीची गरजच कधी भासली नाही. आम्ही दोघी एकाच बेंचवर बसत होतो आणि लेक्चर सुरू असताना इतरांवर कमेंट्स करून जोक्स करीत होतो. मध्येच टीचर्सने गप्पा मारतात म्हणून ओरडा दिल्यानंतर आमच्या नोटबूकच्या मागच्या पेजवर त्या वेगवेगळ्या कलाकृतींनी रंगलेले नोट बूकचे मागच्या पेजवर आमचे राईट चॅट सुरू होत असे. पण आमची अशी घट्ट मैत्री पाहून आणखी एका मैत्रिणीची भर पडली ती म्हणजे पद्मजा...पद्मजा स्वभावाने चंचल होती. तिला फिरणे, बागडणे आवडत असे. तिघींपैकी एक जरी लेक्चरला बसली नाही तर इतर दोघीही बसत नसायच्या....त्यावेळी तर कॉलेजमध्ये आम्हा तिघींना ‘थ्री इडियट्स’ म्हणूनच चिडवले जायचे. अशी होती एक वेगळीच दुनियादारी....
या मस्तीभर्‍या जगण्याने कधी दोन वर्ष झाली कळलीच नाहीत. त्यानंतर हळुहळु प्रत्येकीच्या आयुष्यात आयुष्यात नव नवी वळणे येऊ लागले आणि आणि हळुहळु प्रत्येकीच्या आयुष्यात नव्याने आलेल्या वळणावर हरवून गेलो. त्यावेळी प्रत्येकीला कळतही होते आपण विश्‍वासाने गुंफलेल्या मैत्रीपासून दूर चाललोय...पण त्यावेळी जमलं नाही...आज जरी विस्तारलेल्या या तीन नद्यांप्रमाणे आम्ही तिघी वेगवेगळ्या ठिकाणी असल्या तरी एकमेकींच्या आठवणीत फ्रेंडशीप डे साठी मनातल्या मनात का होईना शुभेच्छा तर दिल्याच असतील. जागा तीच...कॉलेजचे कंपाऊंड, हातात तेच कॉलेजसमोरील
स्नॅक्स सेंटरमधील फेवरेट वडा पाव...आणि त्याला पावसाची साथ...आणि सोबत रंगणार कॉलेजचे ते हरवलेल्या यारीच्या गप्पा...सगळं काही मनातल्या मनात...आज आजपर्यंत आम्ही तिघी जरी शरीराने वेगळे असलो तरी मनाने एकमेकांसोबत होतो आणि कायम राहणार आहोत हा विश्‍वास जागा झालाय...आणि वाट पाहीने हरवलेले ते थ्री इडियट्स एकत्र येण्याच्या दिवसाची...विश यु अ हॅपी फ्रेंडशीप डे...  

Thursday, 30 July 2015

सावित्रीबाईंनीच मला शाळेत आणलं!


गुरूपौर्णिमा म्हणजेच आपल्या योग्य दिशा दाखून प्रगतीपथावर आणणार्‍या गुरूंचे स्मरण करून त्यांना गुरूदक्षिणा देण्याचा दिवस. या दिवशी व्हॉट्स ऍपवर, फेसबूकवर, अनेक सोशल वेबसाईट्सवर गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे, विविध संदेश देणारे एसएमएस झळकु लागतात. काही गुरू-शिष्यांच्या कथाही वाचायला मिळतात. पण संपुर्ण महाराष्ट्रातील महिलांना शिक्षणाची दारे खुले करून देणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य आजही खूप कमी महिला व मुलींना आठवतात. गुरूपौर्णिमेच्या दिवशी अनेक विद्यार्थीनी या आपल्या गुरूंना भेटवस्तू देऊन गुरूपौणिमा साजरी केली असेल. पण ज्यांच्यामूळे आज अनेक महिला व मुली शिक्षीत झाल्या आहेत त्या क्रांतीज्योती सावित्रीमाईंना लेखास्वरूपात वाहिलेली गुरूदक्षिणा...
आज शाळेतील विद्यार्थीनींना तुम्हाला शाळेत कोणी आणलं? असा प्रश्‍न केला असता आपसुक त्यांच्या आईने, बहिणीने, आजीने, बाबांनी, काकांनी अशातल्या अनेकांनी त्यांना शाळेत आणलं असंच उत्तर ऐकायला मिळेल. पण ज्या काळी महिलांना शिक्षणाचा हक्क नव्हता त्यावेळी दलित व स्त्रिया यांना माणूस बनवण्याच्या लढाईत आयुष्य झोकून देणार्‍या सावित्रीबाई होत्या. सर्वात प्रथम महाराष्ट्रातील महिलांना साक्षरेतेचे धडे शिकविणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीमाईच होत्या. सावित्रीबाई नसत्या तर महाराष्ट्र साक्षर व्हायला अजून शे-दोनशे वर्षांचा काळ लागला असता आणि महिलांना आत्मसन्मान काय असतो, हे कळायला शे-पाचशे वर्ष लागली असती. त्यामूळे संपुर्ण महाराष्ट्रातील महिलांच्या व विद्यार्थींनीच्या सावित्रीमाई या गुरूच होत्या. गुरूपौर्णमेच्या दिवशी महाभारत व रामायणातील अनेक गुरूंचा आवर्जुन उल्लेख केला जातो. परंतू शिक्षणामूळेच स्त्रीया सशक्त होऊ शकतात, असा हेतू मनात धरून स्त्री शिक्षणासाठी सतत झटणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीमाईंच्या कर्तुत्वाचा या दिवशी अनेकांना विसर पडतो.
असं म्हणतात...आपल्याला जो ज्ञान देतो तो गुरू असतोच. पण जो आपल्याला प्रगतीच्या मार्गावर प्रवास करीत असताना योग्य दिशा दाखवितो तोही आपला गुरूच असतो. आजच्या अनेक शाळां-महाविद्यालयांमध्ये अनेक शिक्षक-शिक्षिका हे ठरविलेल्या विशीष्ट तासांमध्ये पुस्तकी ज्ञान शिकवून त्याबदल्यात महिन्याचे पगार घेतात. पण ज्या काळी महिलांना घर, दार, शेती आणि चूल व मूल ही चौकट ओलांडायची नाही, असा अलिखित कायदा होता. त्याकाळी कोणताही पगार किंवा स्वार्थ न बाळगता महिलांना घराबाहेर पडण्याचे बळ देऊन त्यांना शिक्षण देण्याचे कार्य सरू केले.
सावित्रीबाई केवळ महिलांना शिक्षण देऊन थांबल्या नाहीत. त्यांनी त्यांना सक्षम करण्यासाठी, धाडसी करण्यासाठी आणि विविध रूढींमध्ये त्रासलेल्या महिलांना त्यातून सोडवण्याचे महान कार्य केलं.  त्या काळात ‘जो शिकेल, त्याच्या सात पिढ्या नरकात जातील’ असं लोक म्हणायचे. म्हणून ही क्रांतीज्योती सावित्रीमाईंनी काढलेली पहिली शाळा मध्येच बंद पडली होती. त्यावर उपाय म्हणून त्यांना सांगण्यात आले की, ‘‘गोर्‍या साहेबानं एक शोध लावलाय की, जो शिकणार नाही त्याच्या चौदा पिढ्या नरकात जातील’. यामुळे नरकाच्या भीतीने लोक शिक्षणाला होकार देऊ लागले. एक जानेवारी, १८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा काढली. त्या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्यानंतर पुण्यातल्या अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. सुरुवातीला शाळेत केवळ सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या वेळी सावित्रीबाईंना अनेकांनी विरोध केला, त्यांच्या अंगावर शेण फेकले, मात्र तरीही सावित्रीबाई थांबल्या नाहीत. त्यांनी संघर्ष करत शिक्षणाच्या प्रसाराचा उपक्रम चालूच ठेवला. त्यांना घर सोडावं लागलं. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. शिक्षणाचा प्रसार व्हावा, प्रत्येकाने शिकावं यासाठी त्या अथक परिश्रम घेत होत्या.
स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणं फार महत्त्वाचं आहे, हे सावित्रीबाईंनी त्या काळीच ओळखलं होतं. त्या वेळी समाजातल्या काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. त्या काळात अतिशय लहान मुलींचे त्यांच्या वयाच्या दुप्पट मोठ्या माणसाशी लग्न लावून दिलं जात असे. अशा विवाहप्रथेमुळे मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. समाजात पुनर्विवाह मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावं लागत असे. विधवा स्त्रियांचा छळ होत असे. यामुळे जोतिरावांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. सावित्रीबाईंनी त्यांना त्यांच्या याही कामात पाठिंबा देऊन ते समर्थपणे चालवलं.  सावित्रीबाईंनी आपल्या शिक्षणाचा लाभ इतर स्त्रियांनाही करून दिला आणि त्यांनाही सुशिक्षित केलं.
सावित्रीमाईंच्या या यशस्वी लढाईमुळे लाखो संख्येने महिला-मुली या विविध कॉर्पोरेट ऑफीसमध्ये उच्च पातळीवर काम करू लागल्या आहेत. त्यांना शाळेत शिकविणारे शिक्षक-शिक्षीका, ऑफीसमध्ये विविध कौशल्य शिकविणारे त्यांचे बॉस हे त्यांचे गुरू असतीलच. यात तीळमात्र शंका नाही. पण ज्यांच्यामुळे आपण मुली-महिला शाळेत जाऊ लागलो त्या सावित्रीबाईंना देखील गुरूपौर्णमेच्या दिवशी गुरूस्थानी ठेऊन त्यांना वंदन करणे आपले कर्तव्य आहे आणि ते आजच्या मुली-महिला विसरत चालल्या आहेत. हे विदारक चित्र बदलण्याची गरज आहे. त्यामूळे सावित्रीच्या लेकींनो...यापुढे तुम्हाला कोणी विचारलं, ‘‘तुम्हाला शाळेत कोणी आणलं?’’ तर अभिमानाने उत्तर द्या, ‘‘मला माझ्या सावित्रीमाईंनी शाळेत आणलं. ’’ जेव्हा महाराष्ट्रातील संपुर्ण महिला-मुलींकडे असे उत्तर मिळण्यास सुरवात होईल त्यावेळी गुरूपौर्णिमेच्या दिवशी क्रांतीज्योती सावित्रीमाईंना खर्‍या अर्थाने गुरूदक्षिणा प्राप्त झाली, असे मी म्हणेण.
प्रमिला पवार

Tuesday, 21 July 2015

व्वा रे ‘कन्यादान’...

झी मराठीवर बाप लेकीच्या मायेची कहाणी सांगणारी ‘कन्यादान’ ही मालिका संपली. मी कधीही मालिका न बघणारी त्या दिवशी त्या मालिकेचा काय एंडींग होतोय? यासाठी एक तासाचा खटोटोप केला. मस्त झाला. त्या मालिकेत कार्तिक आणि गायत्रीच्या लग्नाचा सोहळा अगदी रितीरिवाजाने पार पडला. पण या मालिकेने हलकीशी का होईना एक झलक देऊन समाजात एक विचाराची पेरणी केली जाता जाता...ती म्हणजे ज्यावेळी कार्तिक आणि गायत्रीचे लग्न लावले जाते त्यावेळी तेथे लग्न लावण्यासाठी कोणी पुरूष पुरोहीत दाखविला नसून चक्क सहावारी साडी परिधान केलेली महिला पुरोहीत त्या दोघांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने लग्न लावत होती. पाहून खूप बरे वाटले. महिला पुरोहितांनी धार्मिक विधी, कार्य करायला गेल्या अनेक वर्षापासून सुरुवात केली आहे. पण आजही जेव्हा एखाद्याच्या घरी पुजा-अर्चा, लग्नसोहळे आयोजित केले जातात, तेव्हा सर्वांच्या नजरेसमोर पुरूष पुरोहितच दिसतात. पण महिला पुरोहितही स्पष्ट उच्चार, स्वच्छ आवाज, उत्तम पठणकौशल्य आत्मसात केले असून सोवळा नऊवारी अथवा सहावारी वेश परिधान करून आणि सणाचे-धार्मिक कार्याचे महात्म्य ओळखून आपली जबाबदारी त्या नेटाने पार पाडू शकतात, हा विचार आजही समाजात फारसा काही रूजलेला दिसून आला नाही. समाजाचे काय घेऊन बसलाय हो...विविध विचारांमधून समाजप्रबोधनाचे कार्य करणार्‍या विविध मालिकांमध्येही पुजा-अर्चा व लग्नसोहळ्याप्रसंगी पुरूष पुरोहितच झळकताना दिसतात. पण ‘कन्यादान’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेता घेता एक विचार मात्र समाजाला दिला आहे. ‘पूजा सांगायची तर ती पुरुषानेच, महिलांनी पूजा सांगणे देवाला चालणार नाही,’ अशी मानसिकता आजही समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. महिला पुरोहितांकडे पाहण्याची समाजाची मानसिकता बदलायला हवी आणि या क्षेत्रातील महिलांना गौण न मानता त्यांनाही संधी द्यायला हवी. नेहमीच धोतर आणि पोथीची पिशवी घेऊन बाईकवर फिरणा-या गुरुंजीऐवजी आता लख्ख नऊवारी सोवळ्यात लगबगीत असलेल्या महिला पुरोहित दिसल्या तर त्यांना न हिणवता त्यांचे स्वागत करा. सुरुवातीला महिलांनी पौरोहित्य करावे की नाही, यावरुन काही काळ वादंगही निर्माण झाला होता. मात्र आता बदलत्या काळात या क्षेत्रात निपुण असल्याचं दाखवत, पुरुषांची मक्तेदारी या महिलांनी मोडीत काढलीय. या महिलाही ही जबाबदारी समर्थपणे पार पाडतायेत. फक्त गरज आहे ती समाजाची नाही...प्रथमरीत्या तुमच्यातील प्रत्येकाच्या स्वतःची मानसिकता बदलण्याची...तुमच्यातील प्रत्येकाची मानसिकता बदलली की आपोआप समाजाचीही मानसिकता बदलेल...विचार करून पहा...शेवटी एकच...व्वा रे ‘कन्यादान’...
प्रमिला पवार

Saturday, 11 July 2015

नातं मैत्रीचं....

गेल्याच आठवड्यातली रविवारची सुंदर, प्रसन्न अन् काहीशी निवांत सकाळ! मस्त गुलाबी थंडीत मॉर्निंग वॉक घेऊन आल्यावर कुंडीतला गवती चहा आणि आलं घालून केलेल्या माझ्या आवडीच्या कडक चहाचा आस्वाद घेत निवांतपणे बाल्कनीत बसले होते. बाल्कनीतून समोर दिसणार्‍या डोंगरावर पसरलेली धुक्याची दुलई अजूनही तशीच होती. तिच्यातून आरपार पाहण्याचा प्रयत्न करत पुढील लेखासाठी विषय काय घ्यावा याचा विचार करत होते. तेवढ्यात व्हॉटस् ऍप किणकिणलं... 

सुप्रभात 
खरी मैत्री ही कधी करावी लागत नसते, 
ती आपोआपच होत असते. 
खरी मैत्री ही जपावी लागत नसते, 
ती आपोआपच जपली जात असते. 
खर्‍या मैत्रीला केवळ सहवासाची आस नसते, 
तर निर्मळ अन् स्वच्छंदी मनाची कास असते. 

हे वाचता वाचता, ध्यानीमनी नसतानाही आपोआप आणि अचानक तिच्याशी‘ झालेली मैत्री आणि ती‘ डोळ्यासमोर आली. खरं तर ती आणि मी, ना आम्ही शाळा-कॉलेजच्या मैत्रिणी, ना जवळपास राहणार्‍या अथवा ना नित्य संपर्कातल्या वा ऑफिसमधल्या मैत्रिणी. आमची ओळखही केवळ तीनचार वर्षांपूर्वीच झाली आणि आजपर्यंत आम्ही दोघी एकमेकींना प्रत्यक्षात भेटलोदेखील केवळ तीनचार वेळाच. तरीदेखील आमच्या मैत्रीच्या नात्याची वीण मात्र घट्ट आहे. 
नित्यनेमाने सकाळी सकाळी एकमेकींना गुड मॉर्निंग (अर्थातच थहरींी रिि वर) करून आमच्या दिवसाची सुरुवात होते. मग दिवसभरात जमेल तसे, वेळ मिळेल तसे आम्हाला आवडलेले स्वतःचे अथवा इतरांचेही विचार, साहित्य, जोक्स एकमेकांशी शेअर करतो. या शेअरिंगमध्ये एकमेकींच्या सुख-दुःखाचाही समावेश होतो.

मला आवडणारे तिचे अनेक पैलू आहेत. तिच्या लिखाणातील हळवेपणा आणि वास्तविकता माझ्या मनाला अतिशय भावते आणि तिच्या त्या साहित्यिक किटी पार्टी‘च्या तर मी प्रेमातच पडले आहे. तिच्या अन्य मैत्रिणींचा एक ग्रुप आहे. त्या मैत्रिणी दर महिन्याला एकीच्या घरी जमतात आणि आधीच ठरवलेल्या विषयावर आपापले विचार मांडतात. कुणी आपले विचार कवितेतून व्यक्त करतात; तर कुणी लेखातून. विषय एक, विचार अनेक‘. किती सुंदर कल्पना आहे नं या साहित्यिक किटी पार्टीची‘. खूप खूप भावली माझ्या मनाला. 

खरं तर किटी पार्टी म्हटलं, की डोळ्यासमोर येतात त्या नटूनथटून येणार्‍या सखया, त्यांचे गॉसिप्स, हास्यकल्लोळात नकळत पडणारा विविध पदार्थांचा फडशा, विविध गेम्स आणि त्यानंतर मिळालेल्या बक्षिसांची चर्चा वगैरे वगैरे... 

परंतु तिच्या या अनोख्या साहित्यिक किटी पार्टीमध्ये मी प्रत्यक्षात नव्हे, तरी मनाने मात्र अनेक वेळा जाऊन आले आहे. त्यांच्या ठरलेल्या विषयावरचे माझे विचार अनेकदा कागदावर उतरवलेही आहेत. तिच्या या साहित्यिक किटी पार्टीकडे बघितलं की वाटतं, या सख्या जणू इतरांना संदेश देत आहेत, 

कशाला हवे ते नटवे सुंदर तन, 
सुंदरतेपेक्षा हवे निर्मळ मन 
कशाला हवी ती ओठांना लाली 
त्याऐवजी हवी सत्य आणि मृदू बोली 
कशाला हवे ते नयनातील काजळ 
परी भाव मनातील असावा नितळ 
मनात असावी सच्ची मैत्री-भावना‘ 
सर्वांचे कल्याण‘ हीच असे मनोकामना 

खरंच काही व्यक्ती आपल्यालाही नकळत, अलवारपणे आपल्या आयुष्यात येतात अन् आपल्याला आपलंसं करतात. नकळत आपल्या मनाच्या एका कोपर्‍यात दडून राहतात. आपल्या सुखदुःखात सहभागी होताना सुखाचे क्षण वृद्धिंगत करतात; तर दुःख वाटून घेतात. आणि मग आपसूकच आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून जातात. तिच्या या साहित्यिक किटी पार्टी‘ला उपस्थित राहण्याचा योग मला आजपर्यंत आला नसला, तरी तो लवकरच यावा अशी मनापासून इच्छा आहे. 


तुझी मैत्री मला देते, 
आत्मविश्‍वास अन् धिटाई. 
हे या जन्मीचं भाग्य म्हणू, 
की साता जन्माची पुण्याई!

Thursday, 9 July 2015

मग का नाही दाखवू नये त्या रणरागिणीचा चेहरा?

काही दिवसांपुर्वी एक रणरागिणीने रौद्र रूप धारण करून तिची छेड काढणार्‍या एका मुलाला आपल्या स्टाईने धडा शिकवीत पोलिस स्टेशनमध्येच धुलाई करतानाचा व्हिडीयो सर्व प्रसार माध्यम, व्हॉट्सऍप आणि फेसबूकवर दाखवित होते. खूप बरं वाटलं. कारण एखादा मुलगा आपली छेड काढतोय म्हणून इतर मुली आपली वाट वदलताना दिसतात, तर त्यांची छेडछाड सहन करताना दिसतात. अशा रोडरोमियोंची छेडछाडीची मर्यादा काही दिवसांनी ओलांडते आणि मग काही मुली आत्महत्येचा मार्ग स्विकारतात. त्या रणरागिणीचे हे रौद्र रूप पाहून अशा मुलींनी धडा घेतला पाहीजेच. पण मनात एक खंत राहीली की काही प्रसार माध्यमांनी तिचा व्हिडीयो प्रसारित करताना तिचा चेहरा ब्लर केला. आता यामागे काही तात्विक कारण असुही शकते किंवा तिच्या सुरक्षेबाबचेही कारण असू शकते. पण मी काय म्हणतेय...त्या रणरागिनीने मोठ्या धाडसाने त्या रोडरोमियोला धडा शिकविला. मागचा पुढचा विचार न करता भर पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांसमोर त्याची पिटाई केली. हे कौतुक करण्याजोगेच आहे. मग का नाही दाखवू नये त्या रणरागिणीचा चेहरा?

Saturday, 4 July 2015

बुद्धी भ्रष्ट करणारी ‘सेल्फी विथ अंत्ययात्रे’ची नशा

सध्या व्हॉट्स ऍप आणि फेसबूकवर ‘डिजीटल इंडियाची पहिली सेल्फी’ मोठ्या वेगाने फिरतेय...सेल्फीचे भूत आज समाजामध्ये इतकं चढलं आहे की कोणी आपला मित्र, नातेवाईक आज आपल्यात आता राहीला नाही याचे भानही त्याला नाही. ‘डिजीटल इंडियाची पहिली सेल्फी’ ही अतिशय किळसवाणी आहे. आपला जवळचा माणूस आपल्याला सोडून गेला आहे ही संवेदना केवळ एका सेल्फीने कशी काय भरून निघेल? ही विचार करण्यासाराखी गोष्ट आहे. कधी मित्रांसोबत, कधी मैत्रिणींसोबत, कधी नेत्यांसोबत तर कधी अभिनेत्यासोबत सेल्फी काढणारे नेटीझन्स आता चक्क खांदा देताना उचललेल्या मृतदेहासोबत सेल्फी काढून सोशल साईटवर अपलोड करत आहेत. हा कहरच आहे खूप मोठा...प्रसिद्धीच्या हव्यासापोटी तरुणाईची बदलत चाललेली ही मानसिकता समाजासाठी निश्चितच घातक आहे. ‘सेल्फी विथ अंत्ययात्रा’ काढणार्‍या त्या सेल्फी चाहत्याला माझा एक प्रश्‍न आहे की, तुझ्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या मृतदेहाला खांदा देताना तू तर सेल्फी काढलास. पण तू शेअर केलेल्या या सेल्फी विथ अंत्ययात्रामूळे तुझ्या अंत्ययात्रेला एका जणाचा तरी खांदा लागेल का?
-प्रमिला पवार

Sunday, 7 June 2015

पहिला पाऊस....पहिली आठवण!


आज आलेल्या पहिल्या पाऊसाने आपल्या हळव्या गुलाबी आठवणींना चिंब चिंब भिजवून गेला. पावसाच्या सरी बघताना आपण कधी काळामागे हरखून जुन्या आठवणी ताज्या केल्या ते समजलंही नाही. सगळं अगदी क्षणात घडलं. किंचितही चाहूल लागली नाही. पहिल्या पावसाची पहिली आठवण मनात अलगद जागी झाली. डोळ्यांसमोर पडदा होऊन हळुवारपणे तरळून आली. खरंच किती छान होते ते दिवस, असं नकळत मनात रेंगाळत राहिलं... अगदी कॉफीचे घोट घेतानाही... ती आठवण आपल्या सोबत होती... ती साठवण आपल्या शेजारी होती... हो ना...!

तीव्र उन्हाच्या झळांनी लाही लाही झालेल्या जिवांना गारव्याची अनुभूती देत असते. त्यावर भरीसभर म्हणून पावसानं हजेरी लावली. बेसावध प्रवाशांची आणि तितक्याच बेसावध असलेल्या हळव्या मनांची चांगली तारांबळ उडाली. स्थिर, संथ पाण्यात कुणी तरी इवलासा दगड टाकून निजलेल्या तलावाला जागं करावं, तसं आपलं मन खडबडून उठलं. खिडक्यांच्या फटीतून लहान मुलं डोकावतात, तसं कामाच्या धबागड्यात गुंग असलेल्या खुल्या डोळ्यांमधून पावसाचं अस्तित्व निरखू लागलं. तर काहींच्या आयुष्यात कामाचा व्याप वाढवून गेलं. पावसाच्या सरी कोसळू लागल्यावर कुणी वाळत घातलेले कपडे गोळा करण्यात गुंग होतं, कुणी दुकानांच्या बाहेर ठेवलेल्या चीजवस्तू आत नेत होतं, कुणी लहानमुलांप्रमाणे पावसाशी खेळत होतं, कुणी रस्त्यावर दुथडी भरून पाहणार्‍या प्रवाहात नाचत होतं, तर कुणी दुरूनच पहिल्या पावसाच्या आठवणी जाग्या करीत होतं. प्रत्येकाचा पावसाशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध येत होता. प्रत्येकजण मिळेल ती संधी साधून पावसाशी आपलं भावनिक नातं जोडत होता. जुन्या आठवणींना पहिल्या पावसाशी रिलेट करीत होता. मनाच्या खोल कप्प्यात पहिल्या पावसाचा गारवा साठवून ठेवत होता.

पहिला पाऊस कधी एकटा येत नाही. जसा तो भेटायला येताना आपल्या दोन-एक मित्रांन आपल्या बाईकवर सोबत आणत असतो. अगदी तसंच सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट घेऊन पहिला पाऊस आपल्या भेटीला येत असतो. पाऊस आहेच मुळी थोडा लाजरा आणि थोडा बुजरा! त्यात किंचितही धीटपणा नाही. त्याचा स्वभाव अगदी तंतोतंत पावसात उतरलाय. त्याचं रुसणं, त्याला बोलण्यासाठी शब्दाची गरज न लागणं, त्याचं रागवणं, त्याचं हसणं, त्याचं रडणं, त्याचं चिडवणं...पावसाच्या प्रत्येक सरीत समावलं असतं. त्याचा लहरीपणा सुद्धा त्यानं हुबेहूब कॉपी केलाय. जसा पाऊस कधीच वेळेवर येत नाही, तसाच तो कधी येणार, हे सांगत सुद्धा नाही! आपण अगदी बेसावध असतो. आपली काहीच तयारी नसते. अशा वेळी योग्य संधी साधून पाऊस येतो. तो ही तसाच अगदी पावसाच्या
सुखद गारव्यासारखा आपल्या आयुष्यात येतो. त्याचा काळ, वेळ काही नसतो. पण तो आल्यावर आपल्या आयुष्याचं सोनं करतो. हळव्या आठवणी जाग्या करतो. ठिसूळ उमेदीला उभारी देतो. स्वप्तरंजनाला भरारी देतो. कारण त्यानं अन् पावसानं आपल्या आसुसलेल्या मनावर मनापासून नितांत प्रेम केलेलं असतं. आपल्या तयारीवर, सजगपणावर किंवा बाह्य सौंदर्यावर कधीच ते भाळले नसतात. त्याला मी आवडते आणि मला तो आवडतो, एवढंच काय ते दोघांचे नाते..पाऊस मला आवडतो आणि तो माझ्यासाठी व्याकूळलेला असतो एवढंच! पावसाची सोशिकता त्याला चक्क केरळ, कर्नाटक, गोवा ओलांडून आपल्यापर्यंत येण्यास भाग पाडीत असते. तसंच त्याचं प्रेम दृष्य-अदृश्य संकटांवर मात करून आपल्यापर्यंत पोहचत असतं. सुखाची गर्द सावली देत असतं. नकळत आपलंस करीत असतं. त्याच्या येण्याचा आणि न येण्याचा एवढा टोकाचा फरक आपल्याला जाणवतो.
असा हा पहिला पाऊस जुन्या आठवणी ताज्या करून जातो आणि नव्यांची मुहूर्तमेढ करण्यास जराही विसरत नाही. माझ्या, तुमच्या, आपल्या सर्वांच्या आयुष्यात... हो ना....खरंय ना...! 

Saturday, 6 June 2015

.काय म्हणता? हाय ना बरोबर?

दिल्लीच्या सायबांनो...आख्ख्या देशभरातल्या मॅगीची तपासणी करून दमला असाल ना...आता आरामही भरपूर झाला तुमचा..कधीतरी आमच्या खेड्या पाड्यातल्या शाळंत या जरा...आणि तिथल्या शाळेत मुलांना जे जेवण दिलं जातं त्याची एकदा तपासणी करून पहा...मॅगीची तपासणी करून काय बी हाती लागलं नाही ना...पण आमच्या खेड्या पाड्यातल्या मुलांच्या जेवणाची तपासणी करून तरी काही तरी धागे दोरे लागतील की हाताला...तुम्ही पण चमकाल आणि आमच्या छोट्या छोट्या लेकरांना पौष्टीक आहार बी मिळंल...काय म्हणता? हाय ना बरोबर?

Wednesday, 27 May 2015

माझा वाढदिवस


नमस्कार माझ्या मित्र-मैत्रिणींनो...

आज २७ मे २०१५....माझा जन्मदिवस...आज सकाळपासुन माझ्या मोबाईल, व्हॉट्स ऍप, फेसबुकवर माझ्या प्रेमळ मित्र-मैत्रिणींच्या प्रेमळ शुभेच्छांनी अगदी धूमाकुळ घातला आहे. वाढदिवसाचे शुभेच्छा पाहून, वाचून, ऐकुन अगदी मन आनंदाने भारावुन गेले. तुम्हा सगळ्यांनी मला विविध माध्यमांद्वारे शुभेच्छा संदेश दिलेत, त्याबद्दल मी आपली खुप खुप आभारी आहे.
स्वतःच्या वाढदिवसाबद्दल काय सांगावे? या प्रश्‍नाचे उत्तर देणं हाच मोठा प्रश्‍न आहे. सकाळी उठल्या उठल्या मोठ्या उत्सुकतेने पटापट फेसबूक आणि व्हॉट्स ऍप चालु केले. व्हॉट्स ऍपच्या सर्व कॉलेज फ्रेंड्स आणि स्कूल फ्रेंड्स च्या ग्रूपचे नाव तर ‘हॅपी बर्थ डे प्रमू’ असे ठेवलेच होते...परंतू माझ्या काही पत्रकारांच्या ग्रूप्सवर तर त्यांच्या गोड व प्रेमळ शब्दांच्या बांधणीतून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षावही झाला...ही एक सुंदर भेट ठरली यावर्षीच्या वाढदिवसाची. आज फेसबूकच्या वॉलही फक्त शुभेच्छाच झळकत होत्या. खूप खूप बरं वाटलं हे सर्व पाहून...या शुभेच्छांच्या माध्यामातून माझ्या माणसांचे प्रेम किती आहे हे दिसून आलं. पत्रकारिता क्षेत्रात विविध स्तरावर कार्य करताना अनेक जण मला बोलतात...‘‘प्रमिला तू लोकांची मने जपण्यापेक्षा लोकांचा वापर करण्याचे शिक...आणखी खूप पुढे जाशील...तू लोकांची मने का जपतेच? ’’ मला हे नाही पटलं आणि माझ्या माणसांची मी मने जपत आली...आज त्यांना त्यांच्या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले असेल...
आज पत्रकारिता क्षेत्रात बेधडक कार्य करतेय यामागे माझ्या घरच्यांचा भक्कम पाठींबा मिळाला म्हणून...घरातील पहिली मुलगी म्हणून त्यांच्यावर थोंड दडपण होतंच...पण तरीही अनेक सामाजिक कार्यात हिरीहिरीने भाग घेण्यासाठी, पत्रकारिता क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांनीच बळ दिले. यात माझी आई ही तर एक मैत्रीण बनली. ‘प्रमिला पवार’ हे नाव जेव्हा माझे मामा Ramesh More , Vijay More हे मोठ्या अभिमानाने घेतात, तेव्हा एक वेगळीच प्रेरणा मिळते. पत्रकारिता क्षेत्रात अनेक ऊन-सावल्याही पहाव्या लागल्या. त्यावेळी माझे कुटूंबीच होते ज्यांनी मला सावरले.
आज शाळा सोडून कित्येक वर्ष झाले, पण माझे स्कूल फ्रेंड्स Lalit WaghmareVikrant RautVishal ShindeShrutika Kamble Sumit Patil यांनी अद्याप काय माझी साथ सोडली नाही. आज पत्रकारिता क्षेत्रात उत्तमरित्या काम करू शकते, कोणत्याही बातमीला कशीही वळवू शकते, यामागे माझ्या कॉलेज ग्रूपचे हात आहे. कॉलेजमध्ये असताना अनेक प्रोजेक्ट्सवेळी काम करताना Vinita DodkeSayali Bhoite Yogesh Sante Ashutosh G. PatilShaila Argade KolheShrikant Kharat यांच्या वेगवेगळ्या भन्नाट आयडीयाची कल्पना असे, त्यातूनच पत्रकारिता क्षेत्र काय आहे हे कळाले...नंतरचा टप्पा आहे तो माझ्या एक अविनाशी ‘झेप’ मासिक.... मी कधी कल्पना सुद्धा केली नव्हती की एक संपादक म्हणून मी या क्षेत्रात काम करू शकेल...पण माझ्या एक अविनाशी ‘झेप’ टिमने हे माझ्यासमोर आणले आणि एक आत्मविश्‍वासाने ‘झेप’ मासिक चालवते. आज या ‘झेप’ मासिकाने आपला व्याप वाढवून संपुर्ण महाराष्ट्रभर भम्रंती करीत आहे. एक संपादक म्हणून वावरताना मी माझ्यातली एक प्रतिनिधी कधी हरवून दिली नाही. यात मला Nitin SonawaneNamita Donde यांनी भरपूर मदत केली आणि करीत आहेत. तुमच्या सारखे हिकचिंतक लाभले तर नक्कीच मी एक दिवस गगन भरारी ‘झेप’ घेईल हे नक्कीच. आपले सहकार्य यापुढे असेच लाभेल हीच अपेक्षा आपण सर्वानी दिलेल्या अपार प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद....

Sunday, 17 May 2015

घ्या एक अविनाशी ‘झेप’!

तुम्हाला एक अविनाशी ‘झेप’शी स्वत:ला जोडायचे आहे?

विचार करायला भाग पाडणारे एक अविनाशी ‘झेप’ हे मासिक अशी ओळख झालेल्या मासिकाची निर्मीती विविध सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक प्रश्‍नांना उत्तरे मिळविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले आहे. प्रत्येकाला भावना असतात, मते असतात. पण त्यांना जाणणारे आजच्या काळात क्वचितच आहेत. आपल्या समाजात असे अनेक प्रश्‍न आहेत ज्यांची उत्तरे आजुनही आपल्याला मिळाले नाहीत. याच प्रश्‍नाची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न ‘झेप’ मासिक करीत आहे. वाचकांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यामातून ‘झेप’ मासिकाने आपल्या कार्यास सुरुवात केली आहे. व्यक्त होण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठही उपलब्ध करून दिले आहे. याला साथ हवी आहे तुमची आणि तुमच्यासारख्या प्रेमळ व विश्‍वासू वर्गणीदारांची...जे आयुष्यभर आमच्या पुढील प्रवासात
साथीदार बनून मार्गदर्शन करीत राहतील.
तुम्हाला आमचे म्हणणे पटते का?
तुम्हाला आमचे म्हणणे पटले असेल तर पुढे या. सावरकरांनी सांगितल्याप्रमाणे पण ‘‘मला काय त्याचे?’’ असा विचार करू नका!
तर मग तुम्ही तीन प्रकारे आम्हाला मदत करू शकाल.
१. ‘झेप’च्या कामात, कार्यक्रमात आणि विविध बाबतीत संपूर्ण योगदान द्या. आम्हाला सामील व्हा आणि गरूड ‘झेप’ घ्या.
२. वेळ देणे शक्य नसेल तर जमेल तितल्या तरुणांशी आम्हाला जोडा, संस्थांशी जोडा किंवा जर काही विचारवंत, अभ्यासक आणि प्रतिष्टीत तुमच्याशी संपर्कात असतील तर त्यांच्याशी ‘झेप’ला जोडा. आमच्या ‘झेप’ मासिकाचे वर्गणीदार होऊन आमच्या वैचारिक लढ्याला बळ द्या.
३. हे सुद्धा करणे शक्य नसेल तरी आम्हाला तुमच्या सतत संपर्कात राहणे आवडेल. कारण फेसबूक पेज, ईमेल, व्हॉट्स ऍप, लेख, अशा अनेक मार्गांनी ‘झेप’ मासिकाला शक्य तेवढ्या तरुणांच्या संपर्कात राहायचे आहे.
____________________________________________________
मला ‘झेप’ घ्यायची आहे पण...
स्वतःला ‘झेप’ मासिकाशी जोडून घ्यायचे असेल तर कुठेच जायची गरज नाही. केवळ आमचे वर्गणीदार व्हा आणि पुढील महिन्यापासूनचे अंक तुम्हाला घरपोच मिळतील. सोबत दिलेला एक अर्ज भरा आणि खालील दिलेल्या पत्त्यावर किंवा मबाईल नंबर वर संपर्क साधा. मग तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असाल, संस्थांमध्ये असाल याच्याशी ‘झेप’ मासिकाला घेणे देणे नाही. फक्त ‘झेप’मध्ये येण्याचा तुमचा हेतू स्वच्छ असू दे इतकच!
तुम्ही एक अविनाशी ‘झेप’ मासिकाचे ‘व्हीआयपी सभासद’ झालात का?
व्हिआयपी सभासद होणं अगदी सोपं आहे. आपल्या ओळखीच्या कमीत कमी १० लोकांना ‘झेप’ मासिकाचे वर्गणीदार बनवा आणि बना झेप मासिकाचे ‘व्हीआयपी सभासद’...
एका दमात तीन कामे!
१. पहिले म्हणजे तुम्ही ‘झेप’ मासिकाचे सभासद बनता. तुम्हाला प्रत्येक महिन्याचा ‘झेप’ मासिकाचा अंक प्रकाशीत झाल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला मिळतं. त्यांच्या कार्यक्रमाचं आमंत्रण मिळतं. त्यांच्या योजनांची माहिती मिळते. त्यांच्या कामात स्वतः सहभागी होण्याची संधी मिळते.
२. ज्या दहा किंवा अधिक मित्र किंवा मैत्रिणींना तुमच्यामुळे क़ेवळ कमी रूपयांच्या वर्गणीमध्ये प्रत्येक महिन्याला वाचनीय अंक मिळतात ते खुश होतात. सोबतच त्या दहा जणांच्या ग्रूपमधून महिन्याला किमान चार जणांच्या पाव पेज आकाराच्या ब्लॅक ऍण्ड व्हाईटच्या जाहीराती मोफत देऊ शकतात.
त्यांना त्यांच्या आवडीची अंक मिळाली की ते इतर लोकांना तुमच्याबद्दल सांगतात. त्यांच्यासाठी तुम्ही म्हणजेच ‘झेप’चे प्रतिनिधी बनता.
३. यातून तुम्ही मराठी भाषेच्या संवर्धनाला अमूल्य असा हातभार लावता. आमचा उद्देश आहे प्रत्येक शहातील हजारो साक्षरांना ‘झेप’ मासिकाचे वाचक बनवणं आणि हे लक्ष्य साध्य करणं हे केवळ आणि केवळ मराठी लोकांना त्यांच्या भाषेवर असलेल्या प्रेमातूनच शक्य आहे. आपल्या भाषेचं राज्य व्हावं म्हणून १०६ हुतात्मे झाले. आपल्या भाषेनं राजा व्हावं म्हणून आपण एक दहा-वीस साक्षरांपर्यंत ‘झेप’ मासिक हे पोचविणारच ना! वाचनाची आवड असो वा नसो. फ़क्त मराठी साक्षर अशा दहा लोकांचा आमच्याशी संपर्क करून द्या. त्यांना वाचनाची आवड आपोआप लागेल. आपणच लावू. लावूच लावू. करूनच दाखवू.
संपर्क साधा: 9702317133
धन्यवाद!

Monday, 11 May 2015

बियर बार बंद करण्याऐवजी चक्क उद्घाटन तेही मंत्र्यांकडून?

आज सकाळी दररोजच्या प्रमाणे चहा घेताना पेपर वाचण्याऐवजी टि.व्ही. चॅनेल लावले. म्हटलं ‘अच्छे दिन’ची कोणती गुड न्यूज पहायला मिळते की नाही ते...नवी मुंबई महापालिका निवडणूक झाल्या, महापौर निवडून आले, सल्लुची बेल झाली, नंतर त्याचे कागदपत्र टाईप करताना मध्येच काय ते कार्टातील लाईट गेली, नंतर अनेक राजकीय नेत्यांच्या सल्लुसोबत भेटी-गाठी झाल्या, रविंद्र पाठक यांच्या लढ्याला सलामही केला, मुंबईतील कळबादेवी इमारतीला आग लागली, त्यात दोन जवानांना आपला जीव गमवावा लागला...म्हटलं आता कुठे तरी काही तरी चांगले ऐकायला-पहायला मिळेल...पण आमचं काही नशीब नाही राव गुड न्यूज ऐकायचे...आमच्या महाराष्ट्राचे माननीय अर्थराज्यमंत्र्यांनी चक्क बियर बारचे उद्घाटन केले...ज्या महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरू असताना त्यांच्यासाठी विशीष्ट उपक्रमाचे उद्घाटन करण्याची गरज असताना चक्क बियर बारचे उद्घाटन केले जाते. सध्या सगळीकडे बियर बार बंद करण्याची गरज असताना चक्क बियर बारचे ओपनींग केले जाते आणि ते महाराष्ट्र राज्याच्या अर्थराज्यमंत्र्यांच्या हस्ते....‘‘काय रे देवेंद्रा....काय चाललंय तुझ्या राज्यात? म्हणे ‘अच्छे दिन’ येणार आहेत...आता बियर बारचे उद्घाटन करून नगरमधील संसार उद्वस्त करून तेथील स्त्रियांना ‘अच्छे दिन’ दाखविणार आहात की काय?’’ 

Sunday, 10 May 2015

ती तर माझी आई...

‘देव देव्हार्‍यात नाही देव नाही देवालयी’ हे गाणं ऐकलं होतं. सुरुवातीला गाण्याचा अर्थ मला लवकर कळला नाही. पण मी जेव्हा आईविषयी विचार केला, तेव्हा मला या गाण्याचा खरा अर्थ कळला.
देव सर्वच ठिकाणी असतो असे म्हणतात. आई म्हटल्यानंतर मला खरेच देवत्वाची, त्याच्या अस्तित्वाची जाणीव झाली. माझ्या सार्‍या चिंता दूर करण्यासाठी मी आजही आईच्या विचारांचा आधार घेते. पत्रकारिता क्षेत्रात वावरताना आणि अनेक चढ उतार आले माझ्या आयुष्यात. पण त्यावेळी माझ्या मनात होत असलेली घालमेल ही फक्त तिलाच कळत होती. दिवसातून एकदा तरी माझ्या आईसोबत माझे भांडण होते. पण त्या भांडणातही तिचे प्रेम दिसून येते. ती शिकली नाही, पण मी शिकून काही तरी मोठी व्हावी, ही तिची खूप इच्छा. आज अनेक मान्यवर मंडळींसह वावर असतो, अनेक सामाजिक कार्यासाठी आमंत्रण घरी जातात, ते आमंत्रण स्विकारताना तिला फार अभिमान वाटतो. तिच्या चेहर्‍यावरील हा अभिमान टिकून राहावा, यासाठी आयुष्यभर जगत राहील. एखाद्या वेळेस मला निर्णय घ्यायला जमत नाही हे तिला मी कहीही न सांगता बरोबर कळतं. मग ती हळूच माझ्या जवळ बसेल माझ्या आवडीचे इडले ढोसे बनवून मला खायला घालेल आणि हळूच विचारेल काय झालं? मग मलाही रहावत नाही. मी ही सगळं सांगून बसते. मला चिंता वाटते की माझ्यावर कोसळलेल्या संकटाविषयी ऐकून ती देखील टेन्शन घेईल. पण ती इतरांसारखी नाही. उलट ती मला धाडस देऊन तु असं कर, असं करू नको असे सुचवेल. आम्हा दोघींना समजून घेण्यासाठी शब्दांची कधी गरज लागली नाही. सर्वात पहिला पुरस्कार मला लेक वाचवा अभियानासाठी मिळाला होता, तो स्विकारता माझी नजर तिझ्याकडेच होती. तीची नजर जणू मला सांगत होती...पोरी अजून मोठी हो...मला तुला अजुन मोठं झालेलं पहायचंय...आज मी जे काही मिळवलं ते माझ्या आईसाठी...कारण आईच्या डोळ्यांत माझ्यासाठी अश्रु नाही अभिमान पहायचंय....
नीज न ये तर गीत म्हणावे
अथवा झोके देत बसावे
कोण करी हे जीवेभावे
ती तर माझी आई..

Tuesday, 14 April 2015

‘झेप’ च्या आरोग्य विशेषांकाचे वाचकांकडून कौतूक



एक अविनाशी ‘झेप’ मासिकाचा आरोग्य विशेषांकाचा प्रकाशन सोहळा डोंबिवली वुमन्स वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. स्वाती गाडगीळ व झी चोवीस तास वाहिनेचे असोसिएट प्रोड्यूसर अमोल परांजपे यांच्या हस्ते पार पडला. ‘झेप’ मासिकाचे प्रकाशन केल्यानंतर यंदाच्या अंकात ‘झेप’ मासिकाने विचारलेल्याा रोखठोक सवालाचे उपस्थित सर्व प्रेक्षकांनी तोंडभरून कौतूक केले.

एक अविनाशी ‘झेप’ मासिकाने उत्तुंग भरारी घेण्यास सुरवात केली आहे. याचेच यशस्वी पाऊल उचलून एक अविनाशी ‘झेप’ मासिकाचा जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आरोग्य विशेषांकाचा प्रकाशन सोहळा डोंबिवलीतील रोटरी भवन हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. तसेच नवोदित पत्रकारांसाठी डोंबिवलीतून पहिल्यांदाच सुरू होणार्‍या इंडियन न्यूज रिपोर्टर सेंटरचे उद्धाटन झी चोवीस तास वृत्तवाहिनीचे असोसिएट प्रोड्यूसर अमोल परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘झेप’ मासिकाच्या आरोग्य विशेषांकाचा प्रकाशन सोहळा आणि इंडियन न्यूज रिपोर्टर सेंटरच्या उद्धाटनाच्या निमित्ताने जणू कल्याण डोंबिवलीती सर्व पत्रकांराचा मेळावाच भरला होता. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रमूख पाहूणे अमोल परांजपे व डॉ. स्वाती गाडगीळ यांचा एक अविनाशी ‘झेप’ मासिकाचे कार्यकारी संपादक नितीन सोनवणे यांच्या हस्ते फुलपुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. एक अविनाशी ‘झेप’ मासिकाच्या सहसंपादक नमिता दोंदे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. यावेळी डॉ. स्वाती गाडगीळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना इंडियन न्यूज रिपोर्टर सेंटर हे भावी काळात विवेकी पत्रकार घडवून समाजातील अनेक समस्यांना वाचा फोडतील, अशी आशा व्यक्त केली. ‘संकल्पनांना मार्ग दाखविणारी नवी दिशा, नवा ध्यास’ असे ब्रिदवाक्य असणार्‍या एक अविनाशी ‘झेप’ मासिकाने वाचकांची मने जिंकून वाचकांच्या मनातील प्रश्‍नांची उत्तरे शोधणारे एक अविनाशी ‘झेप’ मासिक अशीच ओळख निर्माण केली असल्याचेही गाडगीळ यांनी सांगितले. त्यानंतर सर्व वाचक वर्ग ज्या उत्सुकतेसाठी एकवटले होते असा एक अविनाशी ‘झेप’ मासिकाचा आरोग्य विशेषांक डॉ. स्वाती गाडगीळ आणि अमोल परांजपे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. मासिकाचे प्रकाशन झाल्यानंतर उपस्थित सर्व वाचकांनी ‘झेप’ मासिकाने ‘शासकीय रूग्णालयांची अवस्था खालावतेय का? या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे कौतूक केले. त्यानंतर एक अविनाशी ‘झेप’ मासिकाच्या संपादक प्रमिला पवार यांनी आपल्या भाषणात आरोग्य क्षेत्रातील अनेक समस्यांचा उलगडा केला. तसेच कल्याण, डोंबिवली, ठाणे व मुंबईतील वाचकांची स्तुतीसुमने प्राप्त केल्यानंतर आता संपुर्ण महाराष्ट्रातील वाचकांची मने जिंकण्यासाठी ‘झेप’ टिम सज्ज झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘झेप’ मासिकाच्या उत्तुंग भरारीत महत्वाचे योगदान असलेले सहसंपादक नमिता दोंदे व कार्यकारी संपादक नितीन सोनवणे, वितरक जनक सोनवणे यांच्या अथक परिश्रमाचे कौतूक केले. त्यानंतर अमोल परांजपे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, ‘‘कणसाचा एक दाना स्वतःला आधी जमिनीत गाडून घेतो व त्यानंतर पुर्णपणे कणिस तयार होते, त्याप्रमाणे चांगल्या कामासाठी स्वतःला आधी झोकून देणार्‍या ‘झेप’ टिमच्या कार्याचे कौतूक केले. तसेच इंडियन न्यूज रिपोर्टर सेंटरच्या उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी माध्यम क्षेत्राबाबत मार्गदर्शनही केले. अखेरीस इंडियन न्यूज रिपोर्टर सेंटरचे सुरेंद्र यादव यांनी सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी दिपक जाधव, सागर नरेकर, रसिका जोशी, संतोष पाठक, वृषाली गोखले, संदिप सामंत आदि माध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ‘झेप’ मासिकाचा आरोग्य विशेषांक विक्रीसाठी प्रत्येक स्टॉलवर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी ९७०२३१७१३३ ८०९७७२८०९७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

एक अविनाशी ‘झेप’ मासिकाच्या आरोग्य दिन विशेषांकाचे प्रकाशन करताना ‘झेप’ मासिकाच्या संपादक प्रमिला पवार, डॉ. स्वाती गाडगीळ, झी चोवीस तासचे अमोल परांजपे, सुर्या फाऊंडेशनचे सुरेंद्र याद

Thursday, 12 March 2015

मनातले बळ मोठे असले तर पंखही आपोआप मोठे होतात!



मनातले बळ मोठे असले तर पंखही आपोआप मोठे होतात!

‘एक झेप मैत्रीणीची’ मध्ये जान्हवी राऊळ यांचे महिलांना मार्गदर्शन

कल्याण, प्रतिनिधी

आपण एकदा आपल्याला गवसलो की, काहीच कठीण नसते. आपण आपल्याला काय हवे आहे, याचा शोध घेऊन त्यामागे लागलो की फक्त पंख बाहेर काढून उंच उडायची गरज असते आणि मनातले बळ मोठे असले तर पंखही आपोआप मोठे होतात. आकाशात ‘झेप’ घ्यायची संधी मिळते, असा सल्ला एक अविनाशी ‘झेप’ मासिक आणि मैत्रीण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘एक झेप मैत्रीणीची’ या कार्यक्रमात ‘ब्रँड गुरू’ जान्हवी राऊळ यांनी उपस्थित महिलांना दिला.

कल्याण येथील मैत्रीण संघ आणि एक अविनाशी ‘झेप’ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘झेप’ मासिकाचा महिला दिन विशेषांक व कर्तुत्ववान महिलांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान ‘ब्रँड गुरू’ जान्हवी राऊळ यांनी भूषविले होते. सायंकाळी ४ च्या सुमारास कल्याणच्या शिवाजी चौक येथील गीता हॉलच्या सभागृहात प्रवेश करणार्‍या प्रत्येक महिलेच्या चेहर्‍यावर सत्कार सोहळ्यासाठीचा व सुप्रसिद्ध नृत्यांगणा सुकन्या काळण यांच्यासाठीचा उत्साह दिसून येत होता. कार्यक्रमाची प्रस्तावना एक अविनाशी ‘झेप’ मासिकाच्या संपादिका प्रमिला पवार यांनी केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, महिलांच्या मनात असलेली पोलिस स्टेशनबाबतची भिती दूर करण्यासाठीचे नवे शिवधनुष्य ‘झेप’ टिमने पेलले आहे. यासाठी ‘झेप’ मासिकाच्या सहसंपादिका नमिता दोंदे, कार्यकारी संपादक नितिन सोनावणे, उपसंपादक सोनम ढेपे-मोरे व वितरक जनक सोनावणे यांच्या कार्याचे कौतूकही त्यांनी केले. त्याचप्रमाणे मैत्रीण संघाच्या अध्यक्षा विजयाताई पोटे यांनी वेळोवेळी ज्या हातांनी चुका झाल्यावर धपाटे दिले त्याच हाताने शाबासकीची थाप दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. जान्हवी राऊळ जशा आज ‘ब्रॅण्ड गुरू’ बनल्या आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनामूळे प्रत्येक महिला या आपल्या व्यवसायाचा ब्रॅण्ड तयार बनवतीलच पण आमचे ‘झेप’ मासिकही भविष्यात मोठे ब्रॅण्ड बनेल, अशी आशा संपादक प्रमिला पवार यांनी व्यक्त केली.

विजयाताई पोटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ‘झेप’ मासिकाच्या सहसंपादिक नमिता दोंदे यांच्या उत्कृष्ट कार्याचे कौतूक केले. तसेच महिलांनीही जान्हवी राऊळ सारखे यशस्वी उद्योजक व्हावे, यासाठी त्यांचा मैत्रीण संघ नेहमीच सहकार्य करेल, असे सांगितले. ज्या महिलांनी खर्‍या पद्धतीने कर्तुत्व गाजवले आहेत व त्यांचा आजतागायत कुठेही सत्कार करण्यात आला नाही, अशा नारी शक्तींचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये संगीतक्षेत्रातील मंजुषा थत्ते, शैक्षणिक क्षेत्रातील छाया घाटगे, नृत्यक्षेत्रातील सुकन्या काळण, पत्रकारिता क्षेत्रात प्राजक्त पोळा, उद्योजिका योगिता रासम व भारती शिंपी, आर्मी क्षेत्रात कॅप्टन. अनुराधा रानडे, आरोग्यक्षेत्रात रुपाली कुलकर्णी व स्मिता भोसले, साहित्य क्षेत्रात वैशाली कांदळगावकर या नारी शक्तींच्या कार्याचा गौरव सन्मानचिन्ह व तुळस देऊन करण्यात आला. त्यानंतर झेप मासिकाचा महिला दिन विशेषांकाचा प्रकाशन सोहळा प्रमूख पाहूणे जान्हवी राऊळ यांच्या हस्ते पार पडला. ‘झेप’ मासिकाच्या मुखपृष्ठावर ‘महिला पोलिस स्टेशनमध्ये जाण्यास घाबरतात का?’ या कव्हरस्टोरीचे अनेकांनी कौतूक केले. तसेच सुप्रसिद्ध कवयित्री विजया वाड लिखीत ‘मला जन्मु द्या हो’ ही कविता आकर्षक ठरली आहे. त्यानंतर सुप्रसिद्ध नृत्यांगणा सुकन्या काळण हीने ‘आप्सरा आली’ या गाण्यांवरील ठूमक्यांनी कार्यक्रमाची शान वाढविली. तिच्या धमाकेदार परफॉर्मन्सने उपस्थित महिलांनी तिच्या तालावर ताल धरून डान्स केला. महिलांचा हा हक्काचा एक दिवस त्यांनी अतिशय सुंदर व मनोरंजनात्मकपणे घालविला. कार्यक्रमाची सांगता ‘झेप’ मासिकाच्या टीमने आपल्या मासिकाच्या प्रती मैत्रीण संघाच्या अध्यक्षा विजयाताई पोटे यांना भेट देऊन केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नमिता दोंदे यांनी अतिशय आकर्षकपणे केले. झेप मासिक विक्रीसाठी उपलब्ध असून अधिक माहितीसाठी ९७०२३१७१३३ किंवा ८०९७७२८०९७ या क्रमांकावर संपर्क साधावा.


Sunday, 1 March 2015

आजच्या दिवसाची सुरवात नव्या विचारासह


आज दररोजच्या प्रमाणे ऑफीसला जाण्यासाठी निघाले...घराबाहेर पडले तर थंडगार वार्‍याची झुळूक माझ्या भेटीला आली गुड मॉर्निंग म्हणाली...मी ही तिला गुड मॉर्निंग म्हणाली. काही अंत पुढे चालल्यावर आपसुक  वर पाहीले तर ढगाळ आकाशाने माझ्या डोक्यावर आशिर्वादाचा हात पसरविला होता. त्यांचा आशिर्वाद घेतला आणि बस स्टॉपवर उभी राहीली बसची वाट बघत! तितक्यात पावसाच्या सरींनी एक सुखदायक स्पर्श केला. कळंना तर्‍हा पावसाची अशीकशी, नको तेव्हा कोसळून केली वाटमारी, आता जणू मृगातही भोगी कुठे अंधारी, गोष्ट पावसाची ही न्यारी...
एकदाची ती बस आली...बस मोकळी पाहून मोकळा श्‍वास घेतला. इतका आनंद शतक पुर्ण झाल्यानंतर विराटलाही झाला नसेल... शीळफाटा-महापे सारखा घाटासारखा वाटणारा प्रवास आणि कानात हेडफोन टाकून एफएमवर लागलेली रोमँटीक गाणी...अहा! काही वेळानंतर एक मुलगी माझ्या सीटच्या बाजूला येऊन बसली. तिने हळूच तिच्या बॅगेतील एक पुस्तक काढले आणि निमूटपणे वाचायला लागली. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लिहीलेल्या नावानुसार ते पुस्तक लोकसेवा आयोग परिक्षेचे होते. त्यात जिल्हाधिकार्‍याची कार्यप्रणाली आणि बरंच काही ती शांतपणे वाचत होती. गेल्या काही दिवसांपासून मी माझ्या एक अविनाशी ‘झेप’ मासिकाच्या ‘महिला दिन विशेषांका’वर काम करीत असतानाच आज त्या मुलीची जिल्हाधिकारी बनण्यासाठीची चिकाटी पाहून खुप आनंद झाला. बसमध्ये पुढच्या स्टॉपवर एक पुरूष आणि छोटूकली-गोंडस मुलगी चढली. बसमध्ये त्यावेळी गर्दी झाली असल्याने ती छोटीशी मुलगी आमच्या सीटच्या बाजूला उभी राहीली आणि ती बसच्या धक्क्याने कुठे पडू नये यासाठी तिला घट्ट धरून तिचे वडील उभे राहीले होते. जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणार्‍या त्या मुलीने उभी असलेल्या त्या छोट्याश्या मुलीकडे एकदा पाहीले आणि पुन्हा आपल्या अभ्यासाला लागली. त्या छोट्याश्या मुलीला बसविण्यासाठी आपल्याकडून काही मदत होईल का? हा विचार ती करेल, ही अपेक्षा मी त्या विद्यार्थीनीकडून करीत होते. पण अखेर माझा अपेक्षाभंग झाला. शेवटी मी माझ्या सीटवर सरकून थोडी जागा केली आणि त्या छोट्याश्या मुलीला बसविले. आपल्याला बसायला मिळणार हे पाहून त्या छोट्याश्या मुलीचा चेहरा आनंदाने फुलला...आणि त्या वडिलांच्या चेहर्‍यावर समाधान...
काय वाटतं तुम्हाला जिल्हाधिकारी होण्यासाठी फक्त अभ्यास करून परिक्षेत पास होणे इथेच संपते का? की सुरू असलेल्या तोंडी परिक्षेत अचानक जन-गण-मन हे राष्ट्रगीत सुरू झाले की लागलीच ताठ उभे राहीले म्हणजे तो व्यक्त जिल्हाधिकारी झाला असे आहे?   

Monday, 2 February 2015

खरंच आपण फक्त महाराष्ट्रीय आहोत का?

आज मी ऑफिसला येण्यासाठी घरून निघाली. दररोजच्या प्रमाणे १२. ३० ची बस पकडली आणि कानात हेडफोन टाकून मराठी अभिमान गीत ऐकत होती. तितक्यात मी खिडकीतून बाहेर एक उभी कार पहिली. मस्त चकाचक पांढरी होती. पण त्यावर लिहिलेल्या एका वाक्याने माझ लक्ष वेधलं. वाक्य होत 'भगवं वादळ'. तितक्यात मी अंदाज बांधला, कार मालक हा शिवसैनिक असणार. बस आणखी पुढे गेली. काही वेळाने मला एक सुमो दिसली. भरगच्च माणस भरलेली… त्यावर लिहिलेल्या 'नीळ वादळ' या वाक्याने माझ्या भुवया आणखी उंचावल्या… ऑफिस मध्ये येता येता मी विचार केला, वादळ हा निसर्ग शक्तीचा एक भाग आहे. आणि आपण माणसांनी या वादळाला देखील विविध धर्माच्या रंगानी रंगवून टाकले आहे. आपण मराठी भाषेचे, परंपरेचे अभिमनपर खूप गीते ऐकतो आणि त्याचा आपल्याला गर्व सुद्धा वाटतो. पण खरंच आपण फक्त महाराष्ट्रीय आहोत का? कि फक्त विशिष्ट समाजाचे आहोत असा मर्यादित विचार करतोय?
-https://www.facebook.com/pramila.pawar.37/posts/768114443274861?notif_t=like

Monday, 19 January 2015

एक अविनाशी ''झेप''…

नमस्कार !!! ..बर्‍याच दिवसानी आवतरतेय आज .. अर्थातच एका नव्या उपक्रमाच्या निमित्ताने ..गेले काही दिवस सगळ ध्यान तिकडेच होते ..तेच आज तुमच्यापुढे सविनय सादर करत आहे ..एक अविनाशी ''झेप''…
एक अविनाशी ''झेप''… मागची माझी भुमिका
तर गेली जवळपास ३-३.५ वर्षे या पत्रकारितेच्या विश्वात मी वावरत आहे ...पडले ,धडपडले ,पुढे गेले ...सगळी काही झाले .. हे सगळ करताना मित्र परीवारही वाढत गेला . काही खुप छान संधी मिळाल्या. अशाच बर्‍याच ठिकाणी चर्चा,गप्पांमध्ये पत्रकारितेच्या विश्वाबाबत चर्चा सुरु असायची..आणि त्यातुन एक मुद्दा पुढे यायचा की . हे इ-जग अधीक छान करण्यासाठी काय काय करता येईल ? अर्थात प्रत्येकाची मते वेगळी असायची ...
पण मला स्वतःला असे वाटते की महाराष्ट्राची अस्मिता, मराठी भाषा, महाराष्ट्राची संस्कृती तसेच परंपरांना केंद्रबिंदू मानून या सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या मराठी तरूणांना हक्काचे व्यासपीठ मिळाले पाहीजे. आणि त्यातुन अवतरले ते एक अविनाशी ''झेप''…
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि युवक- युवतींना उच्च-शिक्षण, शेती, आरोग्य, क्रीडा, सामाजिक आणि राजकीय विषयांवर सहकार्य करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविला जात आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या बालपणापासून कोणत्या ना कोणत्या गोष्टीची, कलेची, क्षेत्राची आवड ही असतेच. त्यातील काही विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगभूत कला व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ मिळते व त्या विद्यार्थ्यांना त्यांची आवड लक्षात येता आवडीनुसार करिअर करू लागतात. ग्रामिण भागातील काही विद्यार्थी असेही आहेत की ज्यांना आपल्या कला व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ मिळत नसल्याने त्यांची आवड ही करिअरमधून
हरवून जाते. अशा अनेक विद्यार्थ्यांना एक हक्काचे व्यासपीठ या मासिकाच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत. दैनंदिन जीवनामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर, वाचन संस्कृतीचा विकास याद्वारे ग्रामविकासाची संकल्पना मनात ठेऊन नवे पाऊल ठेवले आहे. अर्थातच कोणताही व्यावसायिक फायदा मिळवण्याचा उद्देश नाही .
कवितेच्य गावा या सदरांमधुन विविध विचारवंत आणि कवी आपल्याला भेटतीलच वाचकाला एक सर्वांगीण मेजवानी देण्याचा प्रयत्न केला आहे ..आपल्याला तो आवडेल अशी आशा वाटते ...
तुम्हा सर्व मित्र मैत्रिणीची साथ कायम सोबत होती आणि आहे ..ती तशीच कायम राहील या खात्रीसह हा अंक तुमच्यापुढे रुजु करत आहे अंकाबाबत ,लेखांबाबत असणार्‍या सर्व मत मतांतरांचे स्वागत आहे. यासाठी आमचा email id आहे ekavinashijhep@gmail.com.
शेवटी एकच पहिल्या अंकाची धावपळ ,समारंभाची प्रीपोन झालेली तारीख यामुळे तुम्हा सर्व मित्र आणि मैत्रिणी च्या संपर्कात येत नाही याबाबत माफी असावी…
आपली विश्वासू,
प्रमिला पवार